जाहिरात

KBC 17 : 'बिग बीं'नी नातवाला विचारला सर्वात कठीण प्रश्न, उत्तर ऐकताच स्टुडिओत एकच हशा पिकला, Video व्हायरल

बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आणि अभिनेता अगस्त्य नंदाने लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 17 व्या सीजनमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. तत्पूर्वी या नव्या एपिसोडचा भन्नाट प्रोमो व्हायरल झाला आहे.

KBC 17 : 'बिग बीं'नी नातवाला विचारला सर्वात कठीण प्रश्न, उत्तर ऐकताच स्टुडिओत एकच हशा पिकला, Video व्हायरल
Amitabh Bachchan And Agastya Nanda KBC Video

KBC 17 New Episode Promo Viral Video : बॉलिवूडचे सुपरस्टार अभिनेते अमिताभ बच्चन यांचा नातू आणि अभिनेता अगस्त्य नंदाने लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती'च्या 17 व्या सीजनमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. अगस्त्यच्या येऊ घातलेल्या ‘इक्कीस' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा खास एपिसोड आयोजित करण्यात आला आहे. या चित्रपटात त्याने मुख्य भूमिका साकारली आहे.  या एपिसोडमध्ये त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची झलक पाहायला मिळणार आहे. कारण अगस्त्यची आई श्वेता बच्चन आणि बहीण नव्या नवेली नंदा देखील पाहुण्या म्हणून या एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. शोच्या निर्मात्यांनी मंगळवारी रात्री इंस्टाग्रामवर एपिसोडचा एक मजेदार प्रोमो शेअर केला, ज्यात बच्चन कुटुंब धमाक करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये अगस्त्य हॉट सीटवर बसलेला आहे आणि त्याच्यासोबत चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन तसेच सहकलाकार जयदीप अहलावत आणि सिमर भाटिया देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. 

अन् श्वेतालाही हसू आवरलं नाही

एका प्रेक्षकाने अगस्त्यला प्रश्न विचारला, “तुझा आवडता कोण – नाना की नानी?” हे ऐकताच अगस्त्य हसत म्हणाला, “हा खूप कठीण प्रश्न आहे... नाही-नाही, पुढचा प्रश्न विचारा.” पण अमिताभ बच्चन यांनी मध्येच पॉज घेतला आणि त्याला म्हटले, “नाही, बोलू द्या... आम्हाला जाणून घ्यायचं आहे.” त्यानंतर प्रेक्षक म्हणून उपस्थित राहिलेल्या श्वेतालाही हसू आवरलं नाही. यावर जयदीप अहलावतने मजेशीर कमेंट करत म्हटलं, “जर व्हॅनिटी व्हॅनमध्ये मार खायचा असेल तर नानीचं नाव घे आणि घरी जाऊन मार खायचा असेल तर नानाचं नाव घे.” हे ऐकून स्टुडिओमध्ये एकच हशा पिकला. 

https://www.instagram.com/p/DSm_RtPjGFZ/?utm_source=ig_embed&utm_campaign=invalid&ig_rid=a3c9a598-84fe-4b51-a437-cae05949cfa5

नक्की वाचा >> Pune News: पत्नी आंघोळीला गेली होती, पतीने केलं भयंकर कृत्य! पुणे पोलीस जेजुरीला जाताच गेम पलटला

अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगवर केलं अगस्त्यचं कौतुक

‘इक्कीस' हा चित्रपट 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेले सर्वात तरुण परमवीर चक्र विजेते सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. अगस्त्य या चित्त्यांरपटात त्यांची भूमिका साकारत आहे. नुकतेच अमिताभ बच्चन यांनी चित्रपट पाहिल्यानंतर त्यांच्या ब्लॉगवर अगस्त्यचे कौतुक केले. त्यांनी म्हटलं की, नातवाला नवजात बाळ म्हणून हातात घेतल्यापासून तो आज अभिनेता झाल्यापर्यंतच्या आठवणी ताज्या झाल्या. अमिताभ यांनी अगस्त्यच्या अभिनयाला “प्रत्येक शॉटमध्ये परफेक्शन” असे संबोधलं. त्यांनी म्हटलं की, स्क्रीनवर त्याला पाहून डोळे पाणावले. 

नक्की वाचा >> Navi Mumbai: उद्यापासून सुरु होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कोणत्या शहरांसाठी सुरु होणार विमानसेवा?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com