Aishwarya Rai Abhishek Bachchan Divorce: ऐश्वर्या राय - बच्चन आणि अभिषेक बच्चन गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीमुळे कटुता निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. दोघं एकमेकांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात ऐकायला मिळत आहेत. यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे आणि चिंता देखील व्यक्त केली जात आहे.
(नक्की वाचा: अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, निमरत कौरने कन्फर्म केले तिचे रिलेशनशिप स्टेटस; म्हणाली...)
अभिषेक, सलमान नव्हे तर ही होती ऐश्वर्याची पहिली पसंत
दरदिवशी अभिषेक आणि ऐश्वर्याशी संबंधित काही-न्-काही गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. युजर्स देखील सोशल मीडियावर या दोघांबाबत वेगवेगळी माहिती सर्च करत आहेत. यादरम्यान ऐश्वर्याबाबत एक वेगळीच माहिती आता समोर आलीय, ते म्हणजे अभिषेक बच्चन-सलमान खान नव्हे तर तिचे नाव सर्वप्रथम एका बिझनेसमनसोबत जोडले गेले होते. अभिषेकसोबत लग्न होण्यापूर्वी ऐश्वर्या आणि सबीर भाटिया यांच्या नात्याबाबत प्रचंड चर्चा ऐकायला मिळाली. दोघांमध्ये भेटीगाठी देखील खूप झाल्या होत्या, असेही म्हटले जाते.
(नक्की वाचा: Malaika Arora: मलायका अरोरासोबत आता हा नवीन तरुण कोण? VIDEO VIRAL )
त्याने मुलाखतीत दिली प्रेमाची कबुली
ऐश्वर्या आणि सबीरमधील खास मैत्रीची चर्चा मीडियामध्ये बऱ्याचदा ऐकायला मिळाली. सबीरने एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्यावरील प्रेमाचीही कबुली दिली होती आणि तिच्याशी लग्न करायचंय आहे, असेही म्हटलं होतं. दरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेकच्या शाही विवाहसोहळ्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ऐश्वर्या आणि अभिषेकने 2007मध्ये धुमधडाक्यात लग्न केले. पण आता दोघांच्याही घटस्फोटाच्या बातम्या ऐकायला मिळतात, त्यावेळेस खरंच ऐश्वर्या-अभिषेकचे नाते संपुष्टात येणार आहे का? अभिनेत्री निमरत कौरमुळे या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झालाय का? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची चाहतेमंडळी आतुरतेने वाट पाहत आहेत.
(नक्की वाचा: ऐश्वर्या राय अभिषेक बच्चनसोबत आहे इतकी एकनिष्ठ, हा आहे मोठा पुरावा)