दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा पूत्र बाबिल खान याने रविवारी (4 मे) सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमध्ये त्याने बॉलिवूडकरांवर संताप व्यक्त केला. बॉलिवूडमधील नेपोटिजम आणि येथील लॉबीवर ढसाढसा रडत आपला संताप व्यक्त केला. बाबिल खानने आपल्या या व्हिडिओमध्ये अनेक अभिनेता आणि गायक अरिजित सिंह याचंही नाव घेतलं होतं. हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याने अकाऊंट डिलिट केलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
29 एप्रिल रोजी इरफान खानच्या पाचव्या स्मृतिदिनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये शूजित सरकारने इरफान खानसाठी एक भावुक पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्याने लिहिलंय, बाबिल आणि मी एकत्र फुटबॉल खेळतो आणि मी त्याचा पालक झालो आहे. काळजी करू नकोस, मी त्यांची काळजी घेतो. या पत्राच्या अवघ्या काही दिवसानंतर बाबिल खानने बॉलिवूडवर आरोप करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. रविवारी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आता बाबिल खान सर्वांची माफी मागताना दिसत आहे.
त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. शूजित सरकारच्या पोस्टनंतर अवघ्या काही दिवसात बाबिलने हा व्हिडिओ केला. या व्हिडिओ प्रमोशनसाठी करण्यात आल्याचा शक्यता चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. बाबिलने व्हिडिओ केला तेव्हा त्याने मद्य घेतलं होतं का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा - तिन्ही खानांसोबत काम केलं, IPL टीमची मालकीण आता राजकारणात ? अभिनेत्रीने थेट दिलं उत्तर
बाबिल खानने सर्वांची मागितली माफी...
सोशल मीडियावर वापसी करीत सर्वात आधी बाबिल खानने एक एक करीत बॉलिवूडमधील आपल्या मित्रांची माफी मागितली. त्याने अर्जुन कपूर, राघव जुयाल, गौरव आदर्श, अरिजित सिंह यांच्या नावाने पोस्ट शेअर करीत स्पष्टीकरण दिलं आहे. तो त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, सोशल मीडियावर इतर कोणत्याही गोष्टीत सहभागी होण्याची ऊर्जा त्याच्यात शिल्लक राहिलेली नाही. पण त्याच्या मित्रांना आणि तो ज्यांचा आदर करतो त्यांना स्पष्टीकरण देणं ही त्याची जबाबदारी आहे. त्याने आपल्या नव्या पोस्टमध्ये लिहिलंय, राघव भाई तू माझा आयकॉल, माझा आयडल आहेत. माझ्यासाठी मोठ्या भावासारखे आहात.
बाबिल खानचा व्हायरल व्हिडिओ...
बॉलिवूड बनावटी आहे. मी तुम्हाला इतकच सांगू इच्छितो की, शनाया कपूर, अनन्या पांडे, अर्जुन कपूर, सिद्धांत चतुर्वेदी, राघव जुयाल, आदर्श गौरव आणि अरिजीत सिंग सारखे लोक आहेत. आणखी बरीच नावं आहेत. बॉलिवूड खूप बनावटीस खोटं आहे.. बॉलिवूड खूप.. खूप क्रूर आहे.