Shivali Parab News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब या स्टारसोबत रिलेशनशिपमध्ये? नेटकऱ्यांचा प्रश्न

Shivali Parab Relationship News: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब या अभिनेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे का? सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा प्रश्न

जाहिरात
Read Time: 2 mins
"Shivali Parab Relationship News: अभिनेत्री शिवाली परब रिलेशनशिपमध्ये?"

Shivali Parab Relationship News: अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमुळे शिवाली घराघरांत पोहोचलीय. प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने स्वतःच पक्के स्थान निर्माण केलंय. 'कल्याणची चुलबुली' म्हणूनही शिवाली ओळखली जाते. शिवाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. कधी डान्स व्हिडीओ तर वेगवेगळ्या लुकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या शिवाली वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. शिवाली परब रिलेशनशिपमध्ये आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडलाय. 

या फोटोमुळे शिवाली परबच्या रिलेशनशिपची होतेय चर्चा 

अभिनेत्री शिवाली परबने डान्सर आणि अभिनेता रुपेश बानेच्या (Rupesh Bane) घरी गणेशोत्सवानिमित्त भेट दिली. यावेळेस शिवालीने रुपेश आणि त्याच्या आईसोबत फोटो देखील काढले. रुपेशने घरातील गणेशोत्सवाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रुपेशच्या पोस्टवर शिवालीची बहीण स्नेहा परबने "Cutiess❤️" अशी कमेंट केली. स्नेहाच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आणि नेटकऱ्यांच्या मनामध्ये शिवाली-रुपेशच्या रिलेशनशिपबाबत प्रश्न डोकावू लागला. दुसरीकडे स्नेहाच्या कमेंटवर शिवाली आणि रुपेशनंही रिप्लाय दिलाय. 

Photo Credit: Rupesh Bane Instagram

rishi_chillai नावाच्या युजरने "हे दोघं डेट करत आहेत का?" असा प्रश्नही विचारलाय. 

Photo Credit: Rupesh Bane Instagram

तर  nishant._102 नावाच्या युजरने "शिवाली वहिनी?" अशी कमेंट केलीय. 

Photo Credit: Rupesh Bane Instagram

कोण आहे रुपेश बाने? | Who Is Rupesh Bane?

रुपेश बाने हा डान्सर, कोरिओग्राफर आणि अभिनेता आहे. स्टार प्लस वाहिनीवरील 'डान्स प्लस 5' या रिअ‍ॅलिटी शोचा तो विजेता आहे. रुपेशने मराठी सिनेमांमध्येही काम केलंय. 'सिंड्रेला', 'सूर सपाटा', 'हबड्डी', 'रंगीले फंटर', 'घरत गणपती' या सिनेमांसह रुपेश काही वेबसीरिजमध्येही झळकलाय.

(नक्की वाचा: Priya Marathe Shantanu Moghe: आता मी आलोय! प्रिया मराठेचा पती शंतनु मोघेची या लोकप्रिय मालिकेत एण्ट्री, पाहा VIDEO)

तर महाराष्ट्राची हास्यजत्रा शोव्यतिरिक्त शिवालीने चंद्रमुखी (2022), प्रेम प्रथा धुमशान (2022), व्हॉट्सअप लव्ह (2019), पाणीपुरी (2024) या सिनेमांमध्येही काम केलंय. मंगला (2025) सिनेमामध्ये तिने प्रमुख भूमिका साकारलीय. या सिनेमाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. 

Advertisement

(नक्की वाचा: Priya Marathe News: 'अचानक आलेली तब्येतीची अडचण... तोपर्यंत थोडीशी विश्रांती घेते' प्रिया मराठेने या व्हिडीओतून प्रकृतीची दिली होती माहिती)

शिवाली परब आणि रुपेश बाने त्यांच्या डान्सचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असतात. 

शिवाली आणि रुपेशचा डान्स व्हिडीओ | Shivali Parab And Rupesh Bane Dance Video

'मैंने उनसे कल कहा जब तुमसे हुआ मुझे प्यार वो बोली चल झूठी' गाण्यावर कमाल डान्स

दरम्यान गणेशोत्सवानिमित्त सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोमुळे नेटकऱ्यांमध्ये शिवाली आणि रुपेशच्या रिलेशनशिपची चर्चा सुरू झालीय.