
Priya Marathe Shantanu Moghe: अभिनेता शंतनु मोघेने (Priya Marathe Husband Shantanu Moghe) छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. स्टार प्रवाह मराठी मनोरंजन वाहिनीवरील "येड लागलं प्रेमाचं" लोकप्रिय मालिकेमध्ये शंतनु मोघेची एण्ट्री झालीय. स्टार प्रवाह चॅनेलने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शंतुन मोघेचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे. "राया-मंजिरीच्या आयुष्यात आलेला हा शांतनू नक्की कोण असेल? जाणून घेण्यासाठी बघा, येड लागलं प्रेमाचं" असे कॅप्शनही व्हिडीओला देण्यात आलंय.
शंतनु मोघे कोणते पात्र साकारणार आहे?
स्टार प्रवाह चॅनेलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शंतनु मोघे आणि "येड लागलं प्रेमाचं" मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणारा म्हणजे अभिनेता विशाल निकम यांच्यामध्ये हाणामारी सुरू असल्याचं दिसतंय. राया आणि मंजिरीच्या आयुष्यामध्ये आता शांतनू नावाच्या व्यक्तीची एण्ट्री होणार असल्याचं मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. पण हा शांतनू नेमका कोण आहे? त्याचा राया आणि मंजिरी काय संबंध असणार आहे? असे अनेक प्रश्न या व्हिडीओमुळे प्रेक्षकांना पडले आहेत. शंतनु मोघेच्या एण्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता देखील निर्माण झाली आणि आवडत्या अभिनेत्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार म्हणून प्रेक्षकवर्ग खूश आहे. 30 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित करण्यात आलेल्या मालिकेच्या एपिसोडमध्ये शंतनुची दमदार एण्ट्री झालीय.
अभिनेत्री प्रिया मराठेचे कॅन्सर आजाराने निधन | Priya Marathe Passes Away
एकीकडे शंतनु मोघे (Shantanu Moghe) याचे छोट्या पडद्यावर कमबॅक झालंय, ही प्रेक्षकवर्गासाठी आनंदाची बाब आहे. पण दुसरी त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. 31 ऑगस्ट 2025 रोजी शंतनु मोघेची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया मराठेचे (Priya Marathe News) निधन झाले. प्रियाची (Priya Marathe Death News) कॅन्सर आजाराविरोधातील झुंज अपयशी ठरली. मागील दोन वर्षांपासून प्रिया कॅन्सर आजाराविरोधात लढा देत होती. स्टार प्रवाह चॅनेलवरील "तुझेच मी गीत गात आहे" ही मालिका प्रियाची शेवटची मालिका ठरली. प्रकृतीच्या कारणास्तव प्रियाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण मालिका सोडण्यामागील कारण कॅन्सर आजार असेल, याची कल्पनाही त्यावेळेस कोणालाही आली नव्हती. प्रियाने 3 जुलै 2023 रोजी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओद्वारे प्रकृतीबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. प्रियाच्या निधनामुळे मराठी तसेच हिंदी कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे.
(नक्की वाचा: Priya Marathe News: पार्टीत भेट, मैत्री अन् फिल्मी प्रपोज.. अशी आहे प्रिया मराठे- शंतनू मोघेची LOVE STORY)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world