जाहिरात

दिन दिन दिवाळी, जान्हवी रेड्याला ओवाळी! नवऱ्यासोबतचा फोटो अपलोड करताच जान्हवी किल्लेकर झाली ट्रोल

Jahnavi Killekar And Kiran Killekar Instagram Post Viral : बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

दिन दिन दिवाळी, जान्हवी रेड्याला ओवाळी! नवऱ्यासोबतचा फोटो अपलोड करताच जान्हवी किल्लेकर झाली ट्रोल
Jahnavi Killekar Instagram Post Viral
मुंबई:

Jahnavi Killekar And Kiran Killekar Instagram Post Viral : बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. बिग बॉसच्या माध्यमातून तिने तमाम चाहत्यांची मनं तर जिंकलीच, पण तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळं ती प्रचंड ट्रोलही होत आहे. जान्हवीने अनेक मालिकांमध्ये अभिनयाची छाप टाकली आहे. जान्हवीने गतवर्षी अभिनेते पंढरीनाथ कांबळे उर्फ पॅडी कांबळेवर टीका केली होती. पॅडीच्या अॅक्टिंग करिअरबद्दल 'ओव्हर अॅक्टिंग', असं म्हणत जान्हवीने पॅडीवर निशाणा साधला होता. त्यानंतर पॅडीच्या चाहत्यांनी जान्हवीला सोशल मीडियावर धारेवर धरलं होतं. जान्हवीचा पती किरण किल्लेकरनेही या वादात उडी घेतली होती. तेव्हापासून काही ट्रोलर्स जान्हवी आणि तिच्या पतीवर विचित्र टीप्पणी करत आहेत. अशातच जान्हवीने तिचा मुलगा इशान किल्लेकर पती किरण किल्लेकरसोबत दिवाळी सण साजरा केल्याची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. पण या पोस्टवर नेटकऱ्यांनी जान्हवीला विचित्र कमेंट्स करून ट्रोल केलं आहे. 

जान्वही किल्लेकर का होतेय पुन्हा ट्रोल?

जान्हवीने पती आणि मुलासोबत दिवाशी साजरी केल्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शुभ दिपावली असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. ही पोस्ट शेअर करतानाच तिने मुलगा इशान किल्लेकर आणि पती किरण किल्लेकरलाही टॅग केलंय. पण जान्हवीला ट्रोल करणाऱ्या लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर चुकीच्या कमेंट्स केल्याचं समोर आलं आहे. एका यूजरने या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय, सुंदर मुलीचा नवरा नेहमी कालाच असतो. दुसऱ्या एकाने म्हटलंय, रव्याचे लाडू शेजारी डिंकाचा लाडू..तिसऱ्या यूजरने म्हटलंय नेहमी चांगल्या झाडाला किडे खातात. दिन दिन दिवाळी..जान्हवी रेड्याला ओवाळी असंही एकाने म्हटलं आहे. 

नक्की वाचा >> CCTV Video: सराईत चोरट्यांनाही जमलं नसतं..ते या बाईनं केलं! ज्वेलर्समध्ये सर्वांसमोरच सोनं चोरलं..कसं ते पाहा

इथे पाहा जान्हवी किल्लेकरची नवी इन्स्टाग्राम पोस्ट 

दुसरीकडे जान्हवी किल्लेकरच्या खऱ्या चाहत्यांनी तिला दिपावलीच्या शुभेच्छा देत या ट्रोलर्सला सुनावलं आहे. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशा घाणेरड्या कमेंट्स करणं चुकीचं असल्याचं तिच्या चाहत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, जान्हवीने एका मुलाखतीत खळबळजनक विधान केलं होतं. 2012 च्या आसपास स्टार प्रवाहावर एक नंबर नावाची मालिका आली होती. त्यासाठी जान्हवीने अनेकदा ऑडिशन्स दिले होते. पण नंतर जान्हवीला त्या मालिकेसाठी नाकारल्यानं ती खूप नाराज झाली होती. मी सुंदर दिसते म्हणून मला नकार दिला होता, असं तिने म्हटलं होतं. हिरोईनपेक्षा जास्त सुंदर दिसते, त्यामुळे तुला घेऊ शकत नाही, असं म्हणत जान्हवीचं सिलेक्शन नाकारल्याचा आरोप तिने केला होता.

नक्की वाचा >> Pratika Rawal : 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?

Listen to the latest songs, only on JioSaavn.com