Thief Woman Viral Video : दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडल्याने लोकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सोनं खरेदी परवडणारं नसल्यानं काही ग्राहक ज्वेलर्स शॉपमध्ये चक्क सीसीटीव्ही कॅमेरासमोर चोरी करत असल्याच्या घटना घडत आहेत. अशाच प्रकारची चोरीची एक गंभीर घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ग्राहक बनून आलेल्या एका महिलेनं चालाखीने एका ज्वेलर्समध्ये सोन्याची अंगठी चोरली. चोरट्या महिलेनं अशी चोरीसाठी अशी शक्कल लढवली की, सोन्याची अंगठी चोरीला गेल्याचा दुकानदारालाही पत्ता लागला नाही.
व्हिडीओत पाहू शकता की, दोन महिला सोनं खरेदी करण्यासाठी एका ज्वेलर्समध्ये येतात. शॉपमध्ये सोनं विक्री करणारी व्यक्तीही एक महिलाच असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. या महिलेनं ग्राह बनून आलेल्या महिलांना सोन्याच्या अंगठीचा ट्रे दाखवला. त्यात अनेक स्टाईलच्या अंगठ्या दिसत आहेत. त्यावेळी चोरटी महिला एक अंगठी त्या ट्रेमधून बाहेर काढते आणि तिच्या बाजूला असलेल्या मुलीकडे देते. चोरटी मुलगी अंगठी गुपचूप तिच्या हातात ठेवते आणि ती महिला सोन्याच्या ट्रेवर खोटी अंगठी ठेवते. ज्वेलर्समध्ये सीसीटीव्ही असतानाही या महिलेनं सर्वांसमोरच सोन्याची अंगठी चोरली. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी चोरट्यांवर सडकून टीका केली आहे.
नक्की वाचा >> Video : मला बोलू नको..1 धावेसाठी श्रेयस अय्यर अन् रोहित शर्मात जुंपली, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची मज्जाच झाली!
चोरट्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल!
पूर्वी दिल्ली के लक्ष्मी नगर में एक ज्वेलरी शॉप में दो महिलाओं द्वारा सोने की अंगूठी चोरी का मामला सामने आया. धनतेरस के दिन हुई यह घटना दुकान के सीसीटीवी कैमरे में कैद हुई. #viralvideo #Delhi pic.twitter.com/3HfcAmo4NW
— NDTV India (@ndtvindia) October 25, 2025
@mktyaggi नावाच्या यूजरने हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये म्हटलंय की, चोरांनी कमालच केलीय..खतरनाक टेकनिक आहे. सोन्याच्या खऱ्या अंगठीच्या जागी खोटी अंगठी ठेवली. पण सीसीटीव्हीत सगळंकाही रेकॉर्ड झालं आहे. लक्ष्मीनगर दिल्ली..या व्हिडीओला आतापर्यंत अडीच लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. चोरीच्या घटनेच्या या व्हिडीओवर यूजर्सने प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.
एका यूजरने म्हटलंय की, चोरट्या महिला सुसंस्कृत घरातील वाटत आहे. दुसऱ्या एकाने म्हटलंय, एक आई तिच्या मुलीला कसे संस्कार देतेय बघा..चोरी करण्याची ट्रेनिंगच देत आहे. अन्य एकाने म्हटलं आहे की, चुकीचं काम करून पकडलं जाण्याची आणि अपमानित होण्याची भीतीच नाहीय. अन्य एका यूजरने दुकानदाराला सल्ला देत म्हटलंय की, कधीही ज्वेलरीचा ट्रे समोर ठेवल्यावर त्याला नीट बघा..त्यानंतर दुसरा ट्रे काढा.
नक्की वाचा >> Pratika Rawal : 72 तोफांची 'सलामी'! वर्ल्ड रेकॉर्ड करून रचला इतिहास, भारताची धडाकेबाज फलंदाज प्रतिका रावल आहे तरी कोण?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world