Suraj Chavan Janhavi Killekar Viral Video: मराठी बिगबॉस 5 चा विजेता 'झापुक झुपूक' फेम सुरज चव्हाणचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सुरज चव्हाणच्या लग्नात त्याची करवली म्हणून अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने धमाल केली. सुरजच्या हळदीपासून लग्नसोहळा होईपर्यंत प्रत्येक कार्यक्रमात जान्हवीने हजेरी लावली. या लग्नात लाडकी करवली म्हणून सुरजसोबत मिरवणाऱ्या जान्हवीचे फोटो, व्हिडिओ माध्यमांमध्ये तुफान व्हायरल होत आहेत. याच व्हायरल व्हिडिओमुळे नेटकऱ्यांंचा मात्र मोठा गोंधळ उडाला आहे.
अर्रर्र.. नेटकऱ्यांनी सुरजची बायको बदलली!
अभिनेता सुरज चव्हाण आणि संजनाचा 29 नोव्हेंबर 2025 रोजी मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. सुरजच्या लग्नात जान्हवी किल्लेकरने धमाल केली. लग्नातील सुरज आणि जान्हवीचे फोटो, व्हिडिओ माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहेत. मात्र या व्हायरल फोटोंमुळे नेटकऱ्यांचा मात्र मोठा गैरसमज झाला आहे. सुरजच्या लग्नात मिरवणारी जान्हवीच त्याची पत्नी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
VIDEO: 'रिसेप्शन आहे की सर्कस?' प्राजक्ता गायकवाडवर नेटकरी संतापले, 'ती' गोष्ट खटकली
सोशल मीडियावर व्हायरल कंटेट करणाऱ्या काही इंन्टाग्रामवरील पेजेस सुरज आणि जान्हवीचाच विवाह सोहळा झाल्याचे व्हिडिओ पोस्ट करत आहेत. महाराष्ट्राबाहेर सुरज चव्हाणला न ओळखणाऱ्या काही माध्यमांनी असे व्हिडिओ व्हायरल केले आहेत. Introvert नावाच्या ट्वीटर अकाऊंटनेही असाच प्रकार केला आहे. नवरदेवाने नशीब काढले, एवढी सुंदर नवरी मिळाली, अशा कॅप्शनसह हे व्हिडिओ माध्यमांवर व्हायरल होत आहेत.
Hamari kya galti hai bhagwan 🥹 pic.twitter.com/IT6chx0RqH
— Introvert //🙇🏻♂️ (@introvert_hu_ji) December 1, 2025
सुरज चव्हाण आणि अभिनेत्री जान्हवी किल्लेकरबाबत गैरसमज पसरवणाऱ्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मात्र चांगलाच चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ती त्याची पत्नी नसून मैत्रिण आहे. दोघांचे लग्न झाले नाही, अशा प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी मात्र नवरदेवाला सरकारी नोकरी आहे का? त्याचे पाच पेट्रोल पंप असतील म्हणून अशी सुंदर पत्नी मिळाली.. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जान्हवी किल्लेकर रुग्णालयात!
दरम्यान, सुरजच्या लग्नात धमाल करणारी जान्हवी लग्नानंतर थेट रुग्णालयात पोहोचली आहे. सततच्य धावपळीमुळे जान्हवीची तब्येत खराब झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. स्वतः जान्हवीनेच रुग्णालयामधील फोटो पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. नजर इज रियल असा खास कॅप्शनही तिने दिला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world