जाहिरात

Sonal Chauhan: युद्धाच्या कचाट्यातून सुटली 'जन्नत'ची अभिनेत्री सोनल चौहान, शेअर केला अनुभव

मंगळवारी सकाळी काही मर्यादित विमाने दुबईतून मुंबई आणि चेन्नईत पोहोचली. ज्यामध्ये सोनलचा समावेश होता.

Sonal Chauhan: युद्धाच्या कचाट्यातून सुटली 'जन्नत'ची अभिनेत्री सोनल चौहान, शेअर केला अनुभव
  • अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा काही दिवस ठप्प झाली होती
  • बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान दुबईत अडकून पडली होती आणि तिने भारत सरकारकडे मदतीची मागणी केली होती
  • दुबईमधील विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे सोनलला अनपेक्षितपणे काही दिवस तिथे थांबावे लागले होते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

US Iran War: गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेतील वाढत्या युद्धाच्या तणावामुळे आणि अमेरिका-इराणमधील संघर्षामुळे दुबईतील आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली होती. यामुळे अनेक लोक दुबईत अडकून पडले होते. त्यात कुणी विद्यार्थी होते. तर कुणी खेळाडू होते. चित्रपट सृष्टीतील काही कलाकारही दुबईत अडकून पडले होते. त्या पैकीत एक  बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान अडकून पडली होती. आपली इथून सुटका करावी अशी मागणी तिने केली होती. अखेर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर ती सुरक्षितपणे भारतात परतली आहे. अनेक विमाने रद्द झाल्यामुळे सोनलला दुबईत काही दिवस अनपेक्षितपणे राहावे लागले. या युद्धाचा थरार तिने भारतात आल्यानंतर सांगितला आहे. 

सोनलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत मदतीचे आवाहन केले होते. "सध्याची परिस्थिती पाहता भारतात परतण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही, कृपया मार्गदर्शन आणि मदत करावी," अशी विनंती तिने सरकारला केली होती. विशेष म्हणजे, तिने दुबई हे जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण असल्याचे नमूद करत चाहत्यांना संयम बाळगण्याचे आवाहनही केले होते.

नक्की वाचा - 'भारताने माझा विश्वासघात केला' 37 वर्षाच्या 'या' अभिनेत्रीचा देश सोडण्याचा निर्णय, थेट इराणला जाणार

युएई (UAE) सरकारने मर्यादित विमानसेवा सुरू केल्यानंतर सोनलने मंगळवारी मुंबई गाठली. विमानतळावर जाताना तिने 'कमिंग होम' गाणे लावून आपली आनंद व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीचा फटका कलाकारांनाही कसा बसतो, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. 'जन्नत' फेम अभिनेत्री सोनल चौहान गेल्या काही दिवसांपासून दुबईत अडकून पडली होती. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या संघर्षामुळे तेथील विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने सोनल मुंबईत परतली आहे.

नक्की वाचा - Interesting news: अमिर खानला करायचा होता किस, पण तो घाबरला, 'त्या' अभिनेत्रीने तो किस्सा सांगितलाच

मंगळवारी सकाळी काही मर्यादित विमाने दुबईतून मुंबई आणि चेन्नईत पोहोचली. ज्यामध्ये सोनलचा समावेश होता. तिने सर्व चाहत्यांच्या प्रार्थनेसाठी आभार मानले असून आता ती आपल्या कुटुंबीयांसोबत सुरक्षित आहे. सोनलने सांगितले की, दुबईत ती सुरक्षित होती, पण घरी कधी पोहोचणार याची शाश्वती नव्हती. मंगळवारी जेव्हा एमिरेट्सचे विमान मुंबईत उतरले, तेव्हा तिने सोशल मीडियावर आपण घरी पोहोचल्याची पुष्टी केली. विमानतळावर जाताना तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.

Latest and Breaking News on NDTV

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com