Journey Official Trailer : एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या 'जर्नी' (Journey Official Trailer) सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरवरून सिनेमाची कथा रहस्यमय असेल, असे दिसतंय. ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झालीय. सचिन जीवनराव दाभाडे हे सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. सिनेमामध्ये प्रेक्षकांना गूढ कथा पाहायला मिळणार आहे. 'सचिन दाभाडे फिल्म्स'च्या बॅनर अंतर्गत जर्नी सिनेमामध्ये शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला आणि निखिल राठोड हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
(नक्की वाचा: Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा)
सिनेमाची कथा स्वतः सचिन दाभाडे यांनी लिहिली आहे तर संवाद आणि पटकथेचे लेखन रवींद्र मठाधिकारी यांनी केले आहे. सिनेमाचे सहनिर्माते भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड आणि अनिकेत अरविंद बुटाला आहेत.
शुभमसह सर्वांचा प्रवास कोणते वळण घेणार?
सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एक लहान मुलगा अचानक बेपत्ता होतो, ज्यामुळे त्याच्या पालकांची चिंता वाढते आणि मुलाला शोधण्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न सुरू होतात. मुलगा कुठे आहे? तो कोणत्या अडचणींचा सामना करतोय? आणि त्याचा प्रवास कोणते वळण घेईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना 29 नोव्हेंबरला मिळतील कारण या दिवशी सिनेमा बॉक्सऑफिसवर रिलीज होणार आहे.
(नक्की वाचा: अभिषेक बच्चनसोबत अफेअरची चर्चा, निमरत कौरने कन्फर्म केले तिचे रिलेशनशिप स्टेटस; म्हणाली...)
नात्यांबाबत विचार करायला लावणारा सिनेमा
दिग्दर्शक सचिन दाभाडे यांनी म्हटलंय की, "जर्नी सिनेमा (Journey Official Trailer) हा खरा आजच्या पिढीतील कौटुंबिक सिनेमा आहे. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना नात्यात जो दुरावा वाढत जातोय. त्याचे चित्र या चित्रपटात दाखवण्यात आलंय. सिनेमात घडलेल्या एका अनपेक्षित प्रसंगामुळे प्रत्येकास नकळत झालेल्या चुकांची जाणीव होते. निमित्त 14 वर्षाचे लेकरू जेव्हा हरवते तेव्हा घरातील प्रत्येकाची काय अवस्था होते? त्याला शोधण्यासाठी काय पराकाष्ठा करावी लागते? आणि मग विचार येतो की, आपण कुठे कमी पडलोय का? या सिनेमात प्रत्येक कलाकार मुख्य भूमिकेत आहे, अर्थात प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी बनलेला हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल."