जाहिरात

Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा

Jantar Mantar Choomantar Marathi Movie: नवीन वर्षामध्ये 10 जानेवारीला 'जंतर मंतर छूमंतर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये हायर व्हीएफएक्सची कमाल अनुभवायला मिळणार आहे. 

Jantar Mantar Choomantar: दिवाळीच्या मुहूर्तावर 'जंतर मंतर छूमंतर' हॉरर कॉमेडी सिनेमाची घोषणा

Jantar Mantar Choomantar Marathi Movie: दिवाळीच्या मुहूर्तावर (Diwali 2024) सिनेरसिकांसाठी एक धमाकेदार बातमी समोर आली आहे. नवीन वर्षामध्ये 10 जानेवारीला 'जंतर मंतर छूमंतर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिवाळी सणाच्या मंगलमय वातावरणामध्ये गणराज स्टुडिओजने आणि एस.वाय.77 पोस्ट लॅबने त्यांचा आगामी मराठी सिनेमा 'जंतर मंतर छूमंतर'चे टायटल मोशन पोस्टर लाँच केले आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सिनेमाच्या शीर्षकासह प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली.  

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीमधून गोविंदा का गायब आहे? पत्नीनं दिलं उत्तर

(नक्की वाचा: बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीमधून गोविंदा का गायब आहे? पत्नीनं दिलं उत्तर)

सिनेमाची तगडी स्टारकास्ट

टाइटल मोशन पोस्टरमध्ये सिनेमाच्या अनोख्या थीमची झलक पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे. अभिज्ञा भावे, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, निखिल चव्हाण, महेश जाधव आणि भाग्यश्री मोटे या कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 'जंतर मंतर छूमंतर' (Jantar Mantar Choo Mantar)हा एक हॅारर कॅामेडी सिनेमा असून यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हीएफएक्सची जादू तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटांमध्ये अशा पद्धतीच्या AI आणि व्हीएफएक्सचा वापर होत आहे. वैष्णवी जाधव यां सिनेमाच्या निर्मात्या आहेत. 

Sharvari Wagh: माझ्यासाठी गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी बेस्ट आहे -  शर्वरी वाघ

(नक्की वाचा: Sharvari Wagh: माझ्यासाठी गेल्या 3 वर्षांतील ही दिवाळी बेस्ट आहे - शर्वरी वाघ)

"जंतर मंतर छूमंतर हा एक वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. केवळ मनोरंजन नव्हे तर प्रेक्षकांना नवीन अनुभव देण्याचे काम हा सिनेमा करेल. दिवाळीसारख्या शुभ प्रसंगी आम्ही या चित्रपटाचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आणत आहोत, याचा आम्हाला खूप आनंद आहे", अशी प्रतिक्रिया सिनेमाचे दिग्दर्शक श्रेयस जाधव यांनी दिलीय. 

Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण

(नक्की वाचा: Janhvi Kapoor : श्रीदेवीची लेक होणार माजी मुख्यमंत्र्यांच्या घरची सून? नव्या फोटोनं चर्चेला उधाण)

या सिनेमाची कथा नितीन चव्हाण यांनी लिहिली आहे. छायाचित्रणाची धुरा प्रदीप खानविलकर यांनी सांभाळली, तर अभिनय जगताप यांनी या चित्रपटाला संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com