Shefali Jariwala: शेफाली जरीवालाचा मृत्यू कसा झाला, घरात काम करणाऱ्या दोघांची चौकशी; रात्रभर काय-काय घडले? वाचा

Shefali Jariwala Death: रिपोर्ट्सनुसार शेफाली जरीवालाची प्रकृती बिघडल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण वाटेतच शेफालीचा मृत्यू झाला. मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अंधेरीतील कूपर हॉस्पिटलमध्ये तिचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला.

जाहिरात
Read Time: 3 mins
Shefali Jariwala Death News: शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे नेमके कारण काय?

Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. वयाच्या 42व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतलाय. रिपोर्ट्सनुसार कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्याचे म्हटलं जातंय. शेफालीला बेलेव्यू हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेफालीच्या निधनानंतर अंधेरीतील लोखंडवाला परिसरातील तिच्या घरी मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली होती. अशा परिस्थिती अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेफाली जरीवालाच्या मृत्यूचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही. 

शेफाली जरीवालाच्या सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने काय सांगितले?

शेफाली जरीवाल ज्या सोसायटीमध्ये राहत होती तेथील गार्डने सांगितलं की,"शुक्रवारी (27 जून) रात्री जवळपास 10.30 वाजता शेफालीची (Shefali Jariwala Death) प्रकृती बिघडल्यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्याआधी रात्री 9 वाजता तिचा पती पराग त्यागी बाइकने घरी आला होता, त्यांच्यासाठी मी गेट उघडलं होतं. सोसायटीच्या कम्पाउंडमध्ये परवा संध्याकाळीच मॅडम आणि पराग त्यांच्या श्वानासोबत दिसले होते".

(नक्की वाचा: शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का)

पुढे गार्डने असंही सांगितलं की, "पोलीस रात्रीपासूनच येथे उपस्थित आहेत. मोबाइल फॉरेन्सिक युनिटच्या दोन गाड्या होत्या, आता एकच आहे. शेफाली मॅडमला (Shefali Jariwala Death) हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी एक व्यक्ती बाइकने येथे दाखल झाला होता, त्यांचा मित्र वाटत होता आणि तो म्हणाला की शेफाली आता या जगात नाहीय. मला ऐकून विश्वास बसला नाही, परवा दिसलेल्या मॅडम आज आपल्यात नाही?".  

Advertisement

(नक्की वाचा: Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?)

शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणातील आतापर्यंतच्या अपडेट्स

शुक्रवारी रात्री 10:30 वाजेदरम्यान शेफालीला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मध्यरात्री 1 वाजता शेफालीच्या घरी मुंबई पोलीस तसेच फॉरेन्सिक टीम पोहोचली आणि त्यांचा सकाळपर्यंतही तपास सुरू होता. घरामध्ये कुटुंबातील अन्य सदस्य देखील हजर आहेत, त्यांच्या देखील विचारपूस केली जातेय. शेफालीच्या घरी काम करणाऱ्या दोन जणांना चौकशीसाठी अंबोली पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. दरम्यान पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच शेफालीच्या (Shefali Jariwala Death) मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

शेफाली जरीवालाची प्रकृती अचानक बिघडली आणि...  

शेफाली जरीवाला रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस-13'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 'बिग बॉस-13'ची ती दुसरी स्पर्धक जिचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचे म्हटलं जातंय. रिपोर्ट्सनुसार शुक्रवारी रात्री शेफालीची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वर्ष 2021मध्ये 'बिग बॉस-13'चा विजेता सिद्धार्थ शुक्‍लाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला होता.

Advertisement

(नक्की वाचा: Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

कार्डिअ‍ॅक अरेस्ट म्हणजे नेमके काय?

कोरोना महामारीनंतर जगभरामध्ये कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण वाढलंय. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियाच्या रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेमध्येच दरवर्षी जवळपास 3,50,000 लोकांचा कार्डिअ‍ॅक अरेस्ट मृत्यू होतोय. कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये हृदयाची धडधड अचानक बंद होते. म्हणजे हृदयाकडून सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होणे बंद होते. यामुळे काही वेळातच व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.  

Advertisement

शेफाली जरीवाला मूळची गुजरातची रहिवासी 

शेफाली जरीवालाचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला होता. 2002मध्ये रिलीज झालेल्या 'कांटा लगा' (Kaanta Laga Girl Shefali Jariwal) या रीमिक्स गाण्यामुळे शेफाली घराघरात पोहोचली होती. या गाण्यामुळे तिला प्रसिद्धी मिळाली आणि ती 'कांटा लगा गर्ल' म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यावेळेस हे गाण काही कारणांमुळे वादग्रस्तही ठरलं होतं. यानंतर 'बिग बॉस 13'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या शेफालीने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती.