जाहिरात

Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?

Shefali Jariwala Passed Away: शेफाली जरीवाला के निधन से मनोरंजन जगत में शोक की लहर है. उनके फैंस और परिवार वाले उन्हें याद कर रहे हैं और उनके निधन पर शोक व्यक्त कर रहे हैं. शेफाली जरीवाला का 'कांटा लगा' गाना आज भी लोगों की जुबान पर है और उनकी अदाकारी को हमेशा याद रखा जाएगा.

Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?
Shefali Jariwala Death

Shefali Zariwala Passed Away:  'कांटा लगा...' या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमुळे एका रात्रीत स्टार झालेल्या शेफाली जरीवाला हिचे निधन झाले आहे. शुक्रवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शेफाली जरीवालाच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना धक्का बसला आहे. शेफालीच्या मृत्यूमुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. शेफाली जरीवालाचं 'कांटा लगा' हे गाणे आजही लोकांच्या ओठांवर आहे आणि तिचा अभिनय नेहमीच लक्षात राहील.

(नक्की वाचा-  Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

टीव्ही आणि चित्रपट या ग्लॅमरस जगात असे अनेक स्टार आहेत ज्यांनी खूप कमी वयातच नाव, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली. शेफाली त्यापैकी एक होती. शेफालीने अगदी कमी कालावधील आपली देशभरात ओळख मिळवली होती. 2002 मध्ये तिच्या एका म्युझिक व्हिडिओद्वारे देशभर तिच्या लूक आणि स्टाईलची चर्चा होती.

शेफालीने वयाच्या 19 व्या वर्षी मनोरंजन विश्वात तिने प्रवेश केला आणि 'कांटा लगा' या तिच्या पहिल्या म्युझिक व्हिडिओने रातोरात ती सुपरस्टार बनली. तिच्या बोल्ड स्टाईल आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्समुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली.

(नक्की वाचा-  आईमुळे मुलगी बनली सुपरस्टार! लेकीनं केला विश्वासघात, पळून जाऊन केलं लग्न, आयुष्यभर झाला त्रास)

रिपोर्ट्सनुसार, शेफालीची एकूण संपत्ती सुमारे $1 मिलियन म्हणजेच सुमारे 7.5 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. तिच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत अभिनय, म्युझिक व्हिडिओ, टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि ब्रँड एंडोर्समेंट होते. याशिवाय, ती सोशल मीडियावरील प्रमोशनल पोस्टद्वारे भरपूर कमाई करत असे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com