जाहिरात

शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का

Shefali Jariwala Passed Away: बिग बॉसच्या 13 व्या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थना अचानक मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळील लोकांना मोठा धक्का बसला.

शेफालीसह Bigg Boss चे 6 स्पर्धक, ज्यांच्या मृत्यूमुळे सर्वांनाच बसला धक्का

 Shefali Jariwala Passed Away: अभिनेत्री आणि बिग बॉसची माजी स्पर्धक शेफाली जरीवालाच्या निधनामुळे मनोरंजनविश्वावर शोकखळा पसरली आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने शेफालीचं निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी शेफाली जरीवालाच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र शेफालीच्या आधी बिग बॉसच्या ६ माजी स्पर्धकांच्या अचानक निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. 

सिद्धार्थ शुक्ला

बिग बॉसच्या 13 व्या सीजनचा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे 2021 मध्ये वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. सिद्धार्थना अचानक मृत्यूने त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या जवळील लोकांना मोठा धक्का बसला. शरीराने तंदुरुस्त असलेल्या सिद्धार्थच्या अशा जाण्याने देखील अनेकांना धक्का बसला होता.  

(नक्की वाचा-  Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा' गाण्याने रातोरात स्टार; शेफाली जरीवाला मागे किती संपत्ती सोडून गेली?)

प्रत्युषा बॅनर्जी

बिग बॉस 7 मधील स्पर्धक प्रत्युषा बॅनर्जीने 2016 मध्ये वयाच्या 24 व्या वर्षी आत्महत्या केली होती. तिच्या अल्लड आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अनेकांची मने जिंकली होती. तिचं दुःखद निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली.

स्वामी ओम

बिग बॉस 10 चा वादग्रस्त स्पर्धक स्वामी ओम यांचे 2021 मध्ये कोविड-19 मुळे निधन झाले. स्वामीच्या निधनामुळे कोरोना साथीच्या आजाराची तीव्रता अधोरेखित केली.

सोनाली फोगट

बिग बॉस 14 ची स्पर्धक आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचे 2023 मध्ये वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

(नक्की वाचा-  Shefali Jariwala Passed Away: 'कांटा लगा...' गर्ल शेफाली जरीवालाचं निधन, 42 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास)

सोमदास चट्टनूर

बिग बॉस मल्याळम सीझन 1 चा स्पर्धक सोमदास चट्टनूर याचे 2021 मध्ये कोविड-19 मुळे निधन झाले. 

जयश्री रामैया

बिग बॉस कन्नड सीझन 3 मधील स्पर्धक जयश्री रमैय्या हिने 2020 मध्ये आत्महत्या केली. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com