जाहिरात

350 कोटी बजेटचा 'कंगुवा'ची जादू पडली फिकी; पहिल्या दिवसाची कमाई किती?

350 कोटींचे बजेट असलेल्या, ‘कंगुवा’ चित्रपटाची प्रदर्शित होण्यापूर्वी चांगलीच हाईप क्रिएट करण्यात आलेली. मात्र चित्रपटाची निराशाजनक सुरुवात झाली आहे.

350 कोटी बजेटचा 'कंगुवा'ची जादू पडली फिकी;  पहिल्या दिवसाची कमाई किती?

यावर्षी अनेक हीट चित्रपट प्रदर्शित झालेत. त्यामुळे यंदा दिवाळीत सिंघम अगेन,भूलभुलैय्या ३ सारख्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. दोन्ही चित्रपटांनी कोट्यावधींच्या कमाईने डगमगलेल्या बॉलिवूडला आशेचा किरण दाखवला आहे. या सिनेमांच्या प्रदर्शनानंतर एकामागोमाग, एकापेक्षा एक बॉलिवूड, हॉलिवूड सिनेमे सज्ज आहेत. 
 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
आता साउथचा सुपरस्टार अभिनेता सुर्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट कंगुवामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर या चित्रपटात बॉबी देओल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. कंगुवा चित्रपटाचे बजेट 350 कोटी आहे. हा सिनेमा हिंदीसह अनेक (भारतीय) भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्यानं सूर्या आता ‘पॅन इंडिया स्टार' होण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रतिक्षेनंतर कंगुवा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे कंगुवा हा देखील या वर्षातील बहुप्रतिक्षित  चित्रपटांपैकी एक आहे. जो काल (14 नोव्हेंबर) रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 

बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याला पाहिलं का? घटनास्थळावरच शिवकुमारला पोलिसांनी हटकलं होतं

(नक्की वाचा: बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्याला पाहिलं का? घटनास्थळावरच शिवकुमारला पोलिसांनी हटकलं होतं)

कंगुवाची खासियत म्हणजे, चित्रपटाचे व्हिज्युअल इफेक्ट्स, यातील ट्रायबल सेटिंग्स आणि जबरदस्त VFX आणखी आकर्षित करते. व्हिज्युअल्ससोबतच चित्रपटाचे व्हिजनही सिनेमॅटिक अनुभव देतो. त्याचबरोबर चित्रपटातील आणखी एक आकर्षण म्हणजे सूर्याच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो. सूर्या हा तमिळ चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता आहे आणि प्रेक्षकांना त्याच्याकडून त्याच दर्जाच्या कामगिरीची अपेक्षा आहे.

शिवाने दिग्दर्शित केलेला, स्टुडिओ ग्रीन आणि यूव्ही क्रिएशन्स निर्मित, कंगुवामध्ये सुर्या दुहेरी भूमिकेत आहे. या चित्रपटाद्वारे बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल आणि दिशा पटानी तमिळमध्ये पदार्पण करत आहेत. हा चित्रपट तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच आणि स्पॅनिश अशा 8 भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या निवडणूक ड्यूटीमुळे शासनाचा मोठा निर्णय

(नक्की वाचा: राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या निवडणूक ड्यूटीमुळे शासनाचा मोठा निर्णय)

या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. आणि अॅडव्हान्स बूकिंगही जबरदस्त झाली होती. हे सर्व पाहता, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडेल असं वाटत होतं. मात्र, कमाईचे आकडे त्या तुलनेने फारच कमी आहे. बजेट पाहता चित्रपटाची निराशाजनक सुरुवात झाली आहे. ‘कंगुवा'च्या पहिल्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. ‘सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कंगुवा'ने भारतात पहिल्या दिवशी 22 कोटी रुपये कमावले आहेत आणि तब्बल 350 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये ‘कंगुवा'ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचच लक्ष लागून आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com