Kannada Actress Ashika Ranganath's Cousin News: कन्नड सिनेसृष्टीतील अभिनेत्री आशिका रंगनाथ (Ashika Ranganath) हिच्या कुटुंबावर डोंगर कोसळला आहे. आशिका रंगनाथची 22 वर्षांची चुलत बहीण अचला हिने आत्महत्या केल्याची घटनी उघडकीस आली आहे. प्रियकराने सातत्याने केलेल्या छळामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, मयंक नावाचा एक दूरचा नातेवाईक अचलासोबत प्रेमाचे नाटक करत होता. अचला इंजिनिअरिंग पदवीधर होती. अहवालानुसार, मयंकने लग्नापूर्वी अचलावर शारीरिक संबंधांसाठी दबाव आणला होता. अचलाने नकार दिल्यावर, तो तिला त्रास देऊ लागला.
(नक्की वाचा- Viral VIDEO: विराटच्या शतकानंतर तरुणीची रिअॅक्शन व्हायरल; 'ती' मिस्ट्री गर्ल निघाली सोशल मीडिया स्टार)
मयंक अमली पदार्थांचे व्यसन करणारा होता. अचलाने त्याच्या मागणीला दाद न दिल्यानंतर त्याने तिच्यावर शारीरिक अत्याचार, मानसिक छळ आणि सतत फोन करून त्रास देणे सुरू केले. अचला ही आशिकाची मामाची मुलगी होती. आशिकाच्या मावशीने दावा केला आहे की, मयंकने केलेल्या सततच्या छळामुळेच अचला हिने टोकाचे पाऊल उचलले.
गुन्हा दाखल
हासन सिटी पोलीस ठाण्यात मयंक आणि त्याची आई मैना यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अचलाचे पालक आपल्या मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत आहेत. कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, आरोपी प्रियकराविरुद्ध पुरावे असूनही, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अभिनेत्री आशिका रंगनाथ हिने आपल्या चुलत बहिणीच्या मृत्यूबद्दल सध्या कोणतंही वक्तव्य केलेले नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world