दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना (30 वर्ष) हिचा हैदराबाद येथील राहत्या घरी मृतावस्थेत आढळूल आली आहे. तिने आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. टेलिव्हिजन आणि सिनेमांमधून घराघरात पोहोचल्या शोभिताच्या मृत्यूने अनेकांना धक्का बसला. शोभिता हिने 30 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. शोभिताच्या अचानक मृत्यूने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी असलेल्या शोभिताचे अंतिम संस्कार बंगळुरूमध्ये होणार आहे. शोभिता गेल्या दोन वर्षांपासून हैदराबादमध्ये राहत होती. तिच्या मृत्यूमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वर्तवली जात आहे. तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. अभिनेत्रीचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी बंगळुरूला पाठवले जाऊ शकते, अशी माहिती आहे.
(नक्की वाचा- रिंकू राजगुरू दिसणार नव्या रूपात, 'जिजाई' सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न)
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शोभिताने कोंडापूर येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची तक्रार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी गांधी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शोभिताची सिने कारकीर्द
शोभिताने बंगळुरूला गेल्यानंतर चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. गेल्या काही वर्षांत ती टीव्हीवरील एक प्रसिद्ध चेहरा बनली आहे. तिने 12 हून अधिक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. ज्यात गलीपाता, मंगला गोवरी, कोगिले, कृष्णा रुक्मिणी, दीपावू निनादे गलीयू निनाडे आणि अम्मावरू यांचा समावेश आहे.
(नक्की वाचा: Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?तिने एराडोंडाला मूरू, एटीएम, ओंडू काथे हेलवा आणि जॅकपॉट यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. शोभिता अखेरीस कन्नड चित्रपट 'फर्स्ट डे फर्स्ट शो'मध्ये काम केलं होतं. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती सोशल मीडियावर देखील सक्रीय होती.
Helplines Vandrevala Foundation for Mental Health 9999666555 or help@vandrevalafoundation.com TISS iCall 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |