जाहिरात

रिंकू राजगुरू दिसणार नव्या रूपात, 'जिजाई' सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न

Rinku Rajguru Jijai Movie : अभिनेत्री रिंकू राजगुरू नवीन भूमिकेमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

रिंकू राजगुरू दिसणार नव्या रूपात, 'जिजाई' सिनेमाचा मुहूर्त सोहळा संपन्न
Rinku Rajguru : रिंकू राजगुरू दिसणार नव्या भूमिकेमध्ये

Rinku Rajguru Jijai Movie :  'जिजाई' हा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित 'जिजाई' सिनेमाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. नवोदित दिग्दर्शक तृशांत इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात 'सैराट फेम' अभिनेत्री रिंकू राजगुरू प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामुळे 'जिजाई'बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमाच्या मुहूर्त सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कपाळी चंद्रकोर लावलेली रिंकू या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

'सैराट' सिनेमाच्या यशानंतर रिंकू राजगुरू आणि झी स्टुडिओज यांच्यामध्ये एक वेगळेच नाते निर्माण झाले आहे. आता ही जोडी पुन्हा एकदा 'जिजाई'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करण्यासाठी सज्ज झाली आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत.

Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?

(नक्की वाचा: Hashtag Tadev Lagnam : सुबोध भावेला मिळतोय मुलींकडून नकार, पाहिला का व्हिडीओ?)

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर यांनी सिनेमाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "झी स्टुडिओजने नेहमीप्रमाणे नवोदित कलाकारांना आणि दिग्दर्शकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. झी स्टुडिओजने प्रेक्षकांसाठी कायमच दर्जेदार आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट सादर केले आहेत. 'जिजाई' हा त्याच परंपरेचा भाग आहे."

Journey Official Trailer : शुभम गेला कुठे? जर्नी सिनेमाचा थरारक ट्रेलर लाँच 

(नक्की वाचा: Journey Official Trailer : शुभम गेला कुठे? जर्नी सिनेमाचा थरारक ट्रेलर लाँच)

VIDEO: Pune-Jejuri| कार्तिक अमावस्या, भाविकांची जेजुरी गडावर अलोट गर्दी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com