
Kantara: Chapter 1 : अभिनेता रिषभ शेट्टी याचा 'कांतारा: चॅप्टर 1' (Kantara: Chapter 1) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावरही चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या उत्साहाच्या भरात काही चाहते दैवी पात्रांची नक्कल करत असल्याने, चित्रपटाच्या निर्मात्यांनी म्हणजेच होम्बले फिल्म्सने मंगळवारी एक अधिकृत निवेदन जारी करून सार्वजनिक ठिकाणी असे कृत्य न करण्याचे विनम्र आवाहन केले आहे.
परंपरेचा आदर करा
होम्बले फिल्म्सने यांच्या एक्स (X) अकाउंटवर हे निवेदन शेअर केले आहे. तुलूनाडूच्या तटीय क्षेत्रातील 'धैवा आराधना' ही श्रद्धा आणि सांस्कृतिक गौरवाचे गहन प्रतीक आहे. 'कांतारा' आणि 'कांतारा: चॅप्टर 1' हे चित्रपट याच भक्तीचे सन्मानपूर्वक चित्रण करण्यासाठी आणि देव-देवतांच्या महिमेचा उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने बनवले आहेत.
(नक्की वाचा- Film City in Nashik: नाशिकच्या इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी; काय आहे सरकारचा प्लान?)
सार्वजनिक ठिकाणी नक्कल करणे अयोग्य
'धैवा आराधना'बद्दल अटूट आदर राखला जाईल, याची खात्री त्यांनी केली आहे आणि तुलू मातीचे महत्त्व आणि वारसा जगापर्यंत यशस्वीरित्या पोहोचवला आहे. निर्मात्यांनी चाहत्यांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. मात्र, त्याचबरोबर त्यांनी एका गंभीर मस्येकडे लक्ष वेधले आहे.
काहीजण चित्रपटातील दैवी पात्रांची नक्कल करत आहेत आणि सार्वजनिक ठिकाणी किंवा समारंभांमध्ये अयोग्य वर्तन करत आहेत, हे आम्ही पाहिले आहे," असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटात दाखवलेली देव पूजा ही खोल आध्यात्मिक परंपरेत रुजलेली आहे आणि ती केवळ एक पात्र साकारणे नाही. असे कृत्य आपल्या श्रद्धेला कमी लेखण्यासारखे असून, त्यामुळे तुलू समुदायाच्या धार्मिक भावनांना आणि श्रद्धेला ठेच पोहोचेल.
(नक्की वाचा- Bigg Boss Kannada: सगळ्या स्पर्धकांना बाहेर काढलं, 5 कोटी खर्चून बांधलेलं घर सील; नेमकं काय घडलं?)
होम्बले फिल्म्सने लोकांना आवाहन केले आहे की, सिनेमा हॉलमध्ये असो किंवा सार्वजनिक ठिकाणी, दैवी पात्रांची नक्कल करणे किंवा त्यांची अवहेलना करणे समाविष्ट असलेल्या कोणत्याही कृत्यापासून दूर राहावे.
रिषभ शेट्टीचा 'कांतारा: चॅप्टर 1' हा चित्रपट कर्नाटकातील कदंब राजघराण्याच्या शासनकाळावर आधारित आहे. या चित्रपटात रिषभ शेट्टीसोबत रुक्मिणी वसंत, जयराम आणि गुलशन देवैया यांसारखे कलाकार आहेत.
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world