जाहिरात

Kapil Sharma: कपिल शर्माच्या कॅफेवर हल्लाचं कारण काय? बिश्नोई गँगचा खुलासा, ऑडियो क्लिप जारी

Kapil Sharma's cafe attacked : कपिल शर्माचे 'कॅप्स कॅफे' रेस्टॉरंट 4 जुलै रोजी सुरू झाले होते. मात्र, एका महिन्याच्या आतच कपिलच्या कॅफेवर झालेला हा दुसरा गोळीबार आहे.

Kapil Sharma: कपिल शर्माच्या कॅफेवर हल्लाचं कारण काय? बिश्नोई गँगचा खुलासा, ऑडियो क्लिप जारी
  • कनाडा के सरे शहर में कपिल शर्मा के नए कैफे पर हाल ही में गोलीबारी की घटना हुई थी.
  • इस घटना से जुड़ा एक ऑडियो सामने आया है. जिसमें हरि बॉक्सर नामक गैंगस्टर ने कपिल शर्मा को धमकी दी है
  • ऑडियो में कहा गया है कि सलमान खान को शो के उद्घाटन में बुलाने के कारण हमला किया गया है.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Kapil Sharma's cafe attacked : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा यांच्या कॅनडातील नुकत्याच सुरू झालेल्या 'कॅप्स कॅफे' या रेस्टॉरंटवर बुधवारी रात्री गोळीबार झाल. या घटनेनंतर, एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर हरी बॉक्सर याने स्वीकारली आहे.

NDTV या ऑडिओ क्लिपची पुष्टी केलेली नाही, मात्र यात कपिल शर्माला थेट धमकी देण्यात आली आहे. हरी बॉक्सरने दावा केला आहे की, कपिल शर्माने त्याच्या कॅफेच्या उद्घाटनासाठी अभिनेता सलमान खान याला बोलावल्यामुळे हा हल्ला करण्यात आला.

ऑडिओ क्लिपमधील धमकीत काय?

या ऑडिओमध्ये हरी बॉक्सरने सलमान खानसोबत काम करणाऱ्या कलाकारांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली आहे. तो म्हणाला, "जो गोळीबार झाला आहे, तो कपिल शर्माने सलमान खानला उद्घाटनासाठी बोलावल्यामुळे झाला आहे. जो कोणी कलाकार सलमान खानसोबत काम करेल, तो कुणीही असो, आम्ही त्याला सोडणार नाही."

त्याने पुढे इशारा देताना म्हटले की, "पुढील वेळी आम्ही कोणत्याही दिग्दर्शक, निर्माते किंवा कलाकारांना थेट इशारा देणार नाही. आता थेट त्यांच्या छातीवर एके-47 चालेल." ही धमकी केवळ मुंबईतील लहान-मोठे कलाकार आणि निर्माते यांना उद्देशून आहे, असेही त्याने स्पष्ट केले.

एका महिन्यात दुसरा हल्ला

कपिल शर्माचे 'कॅप्स कॅफे' रेस्टॉरंट 4 जुलै रोजी सुरू झाले होते. मात्र, एका महिन्याच्या आतच कपिलच्या कॅफेवर झालेला हा दुसरा गोळीबार आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे कॅनडामध्ये आणि बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकरणात कॅनडा पोलिसांनी तपास सुरू केला असून, पुढील कारवाई केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com