KBC 17 तो उद्धट मुलगा पु्न्हा चर्चेत; बिग बींसोबतचं वर्तन आणि ट्रोलिंगवर म्हणाला...

KBC 17 rude kid Ishit Bhatt apologies : इशित भट्ट नावाच्या स्पर्धकाने आपल्या कथित इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांची माफी मागितली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
KBC 17 rude kid Ishit Bhatt apologies

KBC 17 : रिअ‍ॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती 17' मध्ये स्पर्धक म्हणून आलेल्या एका मुलाचे वर्तन सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी बोलण्याची त्याची पद्धत अनेक इंटरनेट युजर्सना बेशिस्तपणाची वाटली होती, ज्यामुळे त्याला खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मात्र, आता याच इशित भट्ट नावाच्या स्पर्धकाने आपल्या कथित इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांची माफी मागितली आहे.

माफीनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, इशित भट्टने इन्स्टाग्रामवर अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो आणि व्हिडिओ शेअर केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "मी कौन बनेगा करोडपतीमध्ये माझ्या वर्तनाबद्दल मनापासून माफी मागू इच्छितो. मी त्या वेळी घाबरलो होतो आणि माझा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा होता. माझा हेतू अनादर करण्याचा नव्हता, असे स्पष्टीकरण त्याने दिले.

(नक्की वाचा-  Ishit Bhatt : 'तो उद्धट नव्हता...' KBC Boy इशित भट्टने मागितली माफी, पण त्याच्या वागण्यात दडलीय दुसरीच कहाणी)

त्याने पुढे म्हटले की, मी अमिताभ बच्चन सर आणि संपूर्ण केबीसी टीमचा मनापासून आदर करतो. यातून मी एक मोठा धडा शिकलो आहे की शब्द आणि कृती, विशेषतः इतक्या मोठ्या व्यासपीठावर, आपली ओळख कशी दाखवते. मी वचन देतो की भविष्यात मी आणखी विनम्र, आदरणीय आणि विचारशील राहीन.

Advertisement

इशित भट्टला सोशल मीडियावर उद्धट वागणुकीबद्दल मोठी टीका आणि ट्रोलिंग सहन करावी लागली होती. त्याने केबीसी बॉय म्हणून निरोप घेताना, टीकेनंतरही ज्यांनी त्याला पाठिंबा दिला, त्या सर्वांचे आभार मानले आहेत.