Kokan Hearted Girl First Kelvan: लगीनघाई सुरू! कोकण हार्टेड गर्ल अंकिता आणि कुणाल भगतचे पहिले केळवण VIDEO

Kokan Hearted Girl Kelvan Video: कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावरकर आणि कुणाल भगतच्या पहिल्या केळवणाचा व्हिडीओ पाहिला का?

जाहिरात
Read Time: 2 mins

Kokan Hearted Girl Kelvan Video: डिजिटल क्रिएटर कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अंकिता प्रभू वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांच्या घरामध्ये लगीनघाई सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अंकिताने ग्रामदेवतेसमोर लग्नाची पत्रिका आणि श्रीफळ ठेवून आशीर्वाद घेतले. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पहिल्या केळवणाचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. हितेश प्रभू यांच्या घरी अंकिता आणि कुणालसाठी पहिल्या केळवणाचे आयोजन करण्यात आले होते.  

कसे होते पहिले केळवण?

हितेश प्रभू यांच्या कुटुंबीयांनी अंकिता आणि कुणालसाठी अतिशय सुंदर पद्धतीने केळवणाचे आयोजन केले होते. जेवणाच्या थाळीभोवती फुलांची सुंदर रांगोळी आणि रांगोळीच्या मदतीने अंकिता-कुणालच्या नावासह स्वस्तिकही रेखाटण्यात आले होते. केळवणासाठी अंकिताने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती तर कुणालने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि जिन्स पँट असा लुक कॅरी केला होता.  अंकिताच्या योगिनी वहिनींनी दोघांचं औक्षण केले आणि मग सोहळ्यास सुरुवात झाली.  बासुंदी, मोदक, भाजी, मसालेभात, चटणी, बटाटा वडा, पोळी अशी खास मेजवानीही व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. 

(नक्की वाचा: Kokanheartedgirl New Car: कोकण हार्टेड गर्ल अंकिताने घेतली महागडी ऑडी कार)

अंकिता आणि कुणालने काय घेतला उखाणा? 

जेवणास सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी अंकिता आणि कुणालही उखाणा घेण्याचा आग्रह केला. तेव्हा आधी अंकिता आणि तिच्यानंतर कुणालने एकमेकांचे नाव घेऊन उखाणा घेतला. बासुंदी, खायची झालीय मला घाई. कुणालचे नाव घेते सुरू झाली लगीनघाई, असा उखाणा अंकिताने घेतला. अगदी कमी वेळामध्ये उखाणा तयार केला म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून अंकिताचे कौतुकही केले.

"पाटावर पाट...पाटाखाली भुंगा वालावलकरांची पोरगी पटवली ढांगचिकढिंगा", असा उखाणा कुणालने म्हटला. 

(नक्की वाचा: Ankita PrabhuWalawalkar Wedding Card: कोकण हार्टेड गर्लची खास लग्नपत्रिका, कधी करतेय लग्न?)

दरम्यान अंकिता आणि कुणालचे लग्न कधी आहे? हे अजूनही कळू शकलेले नाही. त्यांच्या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Advertisement