Kokan Heart Girl And Kunal Bhagat Engagement Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगत 16 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वतःच्या लग्नसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स ही मंडळी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. ग्रामदेवतेसमोर लग्नाची पत्रिका ठेवल्यापासून अंकिता आणि कुणाल त्यांच्या लग्नसोहळ्याशी संबंधित सर्व घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 14 फेब्रुवारीला अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शिवाय एक खास व्हिडीओ देखील या दोघांनी पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये साखरपुड्यातील खास क्षण पाहायला मिळत आहेत. अंकिता आणि कुणाल त्यांच्या आयुष्यातील नवी प्रवासास सुरुवात करत आहेत. यानिमित्ताने या प्रवासातील प्रत्येक आठवणींची साठवण ते करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडीओतील खास गाण्याचे बोल :
तुझ्या रूपाचं चांदणं सभोवती
उभ्या उन्हात शिरशिरी जशी प्रिये
ही हुरहुर अशी अधीर करते नी हुळहुळतो
नजर झुरते उगीच छळते नी भिरभिरतो
जीव राहुनी राहुनी, तुझ्या मागुनी मागुनी,
तुझी होऊनी सावली सखये |
(नक्की वाचा: कोकणची परी...! कविता-शायरी नव्हे तर कोकण हार्टेड गर्लच्या घोवाने थेट तयार केले गाणं)
यापूर्वीही कुणाल-अंकिताने खास व्हिडीओ शेअर केला होता. होणाऱ्या पत्नीसाठी त्याने कविता, शायरी नव्हे तर थेट गाणंच चित्रित केले आहे. कुणालनं गाण्याबाबत थोडक्यात माहिती देखील शेअर केलीय. गाण्याबाबत कुणालेना सांगितलं होते की, "मी लहानपणापासून एक स्वप्न बघितलंय म्हणजे आपल्याला परीची गोष्ट सांगतात की अशी अशी एक परी होती आणि एवढे वर्ष ती फक्त पाठमोऱ्हीच होती आज ती टर्न करणार आहे...कोकणपरीच घेऊन येतोय".