![तुझी होऊनी सावली सखये! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालच्या साखरपुड्याचे खास क्षण तुझी होऊनी सावली सखये! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालच्या साखरपुड्याचे खास क्षण](https://c.ndtvimg.com/2025-02/7kv555io_ankita-prabhuwalawalkar-engagement-video_625x300_15_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
Kokan Heart Girl And Kunal Bhagat Engagement Video: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आणि संगीत दिग्दर्शक कुणाल भगत 16 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. स्वतःच्या लग्नसोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स ही मंडळी चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. ग्रामदेवतेसमोर लग्नाची पत्रिका ठेवल्यापासून अंकिता आणि कुणाल त्यांच्या लग्नसोहळ्याशी संबंधित सर्व घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 14 फेब्रुवारीला अंकिता प्रभू वालावलकर आणि कुणाल भगतचा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याचे फोटो अंकिताने इन्स्टाग्रावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. शिवाय एक खास व्हिडीओ देखील या दोघांनी पोस्ट केलाय. या व्हिडीओमध्ये साखरपुड्यातील खास क्षण पाहायला मिळत आहेत. अंकिता आणि कुणाल त्यांच्या आयुष्यातील नवी प्रवासास सुरुवात करत आहेत. यानिमित्ताने या प्रवासातील प्रत्येक आठवणींची साठवण ते करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हिडीओतील खास गाण्याचे बोल :
तुझ्या रूपाचं चांदणं सभोवती
उभ्या उन्हात शिरशिरी जशी प्रिये
ही हुरहुर अशी अधीर करते नी हुळहुळतो
नजर झुरते उगीच छळते नी भिरभिरतो
जीव राहुनी राहुनी, तुझ्या मागुनी मागुनी,
तुझी होऊनी सावली सखये |
(नक्की वाचा: कोकणची परी...! कविता-शायरी नव्हे तर कोकण हार्टेड गर्लच्या घोवाने थेट तयार केले गाणं)
यापूर्वीही कुणाल-अंकिताने खास व्हिडीओ शेअर केला होता. होणाऱ्या पत्नीसाठी त्याने कविता, शायरी नव्हे तर थेट गाणंच चित्रित केले आहे. कुणालनं गाण्याबाबत थोडक्यात माहिती देखील शेअर केलीय. गाण्याबाबत कुणालेना सांगितलं होते की, "मी लहानपणापासून एक स्वप्न बघितलंय म्हणजे आपल्याला परीची गोष्ट सांगतात की अशी अशी एक परी होती आणि एवढे वर्ष ती फक्त पाठमोऱ्हीच होती आज ती टर्न करणार आहे...कोकणपरीच घेऊन येतोय".
(नक्की वाचा: आयुष्यभरासाठी बंदिस्त! कोकण हार्टेड गर्ल आणि कुणालचा साखरपुडा सोहळा)
अंकिता-कुणालने आगळ्यावेगळ्या प्री वेडिंग व्हिडीओचीही मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. "सुरुवातीला कुठे होतं ओ प्रीवेडिंग पण लग्नं टिकलीच ना? आतापेक्षा तरी जास्तच…सगळ्याच गोष्टी इतरांसारख्या केल्या तरच आपल्याला समाजात स्थान मिळेल असं नाही…आयुष्य ज्या व्यक्तीसोबत घालवणार त्या व्यक्तीसोबतच photoshoot म्हणजे प्रीवेडिंग नव्हे तर आपल्या मनात असलेल्या सगळ्या अपूर्ण गोष्टी पूर्ण करणं आणि नवीन आयुष्याकडे वळणं हे खरं प्री वेडिंग… इतर लोक जे करतात ते आपण फक्त पाहत राहावे……मी असं म्हणणार नाही की तुम्ही हेच करा पण करून बघायला काय हरकत आहे? बाकी कसं वाटल माझं प्री वेडिंग????" असे मनाले भिडणारे कॅप्शन त्यांनी व्हिडीओला दिले होते.
दरम्यान अंकिता आणि कुणाल भगतचा विवाहसोहळा 16 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world