Parzaan Dastur Photos: अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan), अभिनेत्री काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) यांचा सुपरडुपर हिट सिनेमा "कुछ कुछ होता है" 1998मध्ये बॉक्सऑफिसवर झळकला होता. बॉक्सऑफिसवर या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली होती. सिनेमामध्ये अनेक गोंडस मुलांचा समावेश होता, यापैकीच एक होता सायलेंट सरदारजी. संपूर्ण सिनेमामध्ये हा छोटा मुलगा केवळ शांत आणि रात्रीच्या वेळेस चांदण्या मोजताना दिसला. अभिनेता परजान दस्तूरने ही भूमिका साकारली होती आणि लोकांना सायलेंट सरदारजी प्रचंड आवडलाही होता. इतक्या वर्षांनंतर सायलेंट सरदारजीला ओळखणंही कठीण झालंय, पाहिले का त्याचे फोटो?
"कुछ कुछ होता है" सिनेमामध्ये परजान दस्तूरने क्युट सरदारजीची भूमिका उत्तमरित्या साकारली होती.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
सिनेमांव्यतिरिक्त परजान दस्तूर जिलबीच्या जाहिरातीमध्येही झळकला होता.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
परजानने बॉलिवूडमध्ये 'मोहब्बत', 'कहो ना प्यार है', 'ब्रेक के बाद', 'दिल बार बार', 'जुबैदा', 'कभी खुशी कभी गम' यासारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
2005 मध्ये परजानने 'परजानिया फिल्म'मध्ये खास भूमिका निभावली होती. या सिनेमामध्ये गुजरातमधील दंगलीदरम्यानं बेपत्ता झालेल्या मुलाची भूमिका त्यानं साकारली होती.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
2009मध्ये सिकंदर सिनेमामध्ये त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
(नक्की वाचा: SRK King Movie: '18 वर्षांपूर्वी त्याने मला शिकवलं...' SRKच्या किंग सिनेमात क्वीनची एण्ट्री, अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल)
सिकंदर सिनेमामध्ये त्याने फुटबॉल खेळ खेळण्याची आवड असणाऱ्या मुलाची भूमिका साकारलीय. याच मुलाला एकेदिवशी बंदूक मिळाल्यानंतर त्याचे जीवन कसे बदलून जाते, याची कहाणी सिनेमामध्ये पाहायला मिळाली.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
2021मध्ये परजान दस्तूरने डेलना श्रॉफशी लग्न केले. डेलना ही परजानची गर्लफ्रेंड होती, 2019मध्ये परजानने तिला प्रपोज केले होते.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
(नक्की वाचा: Shah Rukh Khan: संपूर्ण सिनेमात स्कर्ट घालण्याची करणची अट, मग शाहरुखने काय केले?)
करिअरबाबत सांगायचे झाले तर बालकलाकार म्हणून परजानची कारर्किद चांगली राहिलीय पण मोठेपणी त्याला फारसे यश मिळू शकले नाही.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
यानंतर त्याने स्वतःचेच प्रोडक्शन हाऊस सुरू केले.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram
परजान दस्तूर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर तो स्वतःचे फोटो आणि काही गोष्टींचे अनुभव शेअर करत असतो.
Photo Credit: Parzaan Dastur Instagram