
- पुणे के कोथरूड में मराठी फिल्म मनाचे श्लोक के प्रीमियर शो को हिंदुत्ववादी संगठनों ने बंद करा दिया.
- विरोधी संगठनों ने आरोप लगाया कि फिल्म का नाम समर्थ रामदास की पवित्र रचना के अपमान में रखा गया है.
- बॉम्बे हाई कोर्ट ने फिल्म के शीर्षक विवाद को खारिज करते हुए रिलीज़ की अनुमति दे दी है.
Manache Shlok Movie: पुणे जिल्ह्यातील कोथरुड येथे मराठी सिनेमा 'मनाचे श्लोक'चा प्रीमिअर शो हिंदुत्ववादी संघटनांनी बंद पाडला. या संघटनांनी सिनेमाच्या नावावर आक्षेप घेत आरोप केलाय की निर्मात्यांनी 'लिव्ह-इन रिलेशनशिप' या विषयावर आधारित असणाऱ्या सिनेमाचे नाव 'मनाचे श्लोक' असे ठेवून समर्थ रामदासांचा अपमान केला आहे.
'मनाचे श्लोक' हे श्लोकांचे आध्यात्मिक पुस्तक आहे, जे समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलंय. सिनेमाच्या नावाला विरोध करणाऱ्या संघटनांचा आरोप आहे की, सिनेमाची कथा लिव्ह इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक आणि वादग्रस्त विषयावर आधारित आहे, जी 'मनाचे श्लोक' या आध्यात्मिक तसेच पवित्र नावाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
हिंदुत्ववादी संघटनांनी नेमका काय आरोप केलाय?
सिनेमाच्या विषयाचा विचार करता त्याच्या शीर्षकासाठी पवित्र धार्मिक नावाचा वापर करणे म्हणजे धार्मिक भावना दुखावण्यासारखे आहे आणि समर्थ रामदास स्वामींच्या उपदेशांचा एका अशा विषयासाठी वापर केला गेलाय जे त्यांच्या आदर्श आणि शिकवणीच्या विरुद्ध मानले जातंय, ज्यामुळे महान संताचा अपमान झालाय, असा आरोप सिनेमाच्या नावाला विरोध करणाऱ्या संघटनांनी केलाय.
मनाचे श्लोक सिनेमासाठी मराठी कलाकार एकवटले, नोंदवला निषेध
सोशल मीडियावर मराठी कलाकार 'मनाचे श्लोक' सिनेमाला पाठिंबा दर्शवत निषेध नोंदवत आहेत. पुण्यात घडलेल्या प्रकाराला विरोध दर्शवण्यासाठी मराठी कलाकार एकवटले आहेत.

Photo Credit: Girija Oak Godbole And Siddharth Chandekar Insta
...मेहनतीचं नुकसान : अभिनेत्री सायली संजीव

Photo Credit: Ashish Bende And Sayali Sanjeev Insta
मराठी कलाकारांनी जाहीर निषेध नोंदवला

Photo Credit: Amey Wagh And Kshitish Date Insta

Photo Credit: Umesh Kamat And Priyadarshini Indalkar Insta

Photo Credit: Priya Bapat And Sakhi Gokhale Insta
मृण्मयी देशपांडेने घेतला मोठा निर्णय
सिनेमाच्या नावाला होणारा विरोध पाहता मृण्मयी देशपांडेने सिनेमाचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतलाय, याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने म्हटलंय की, " नमस्कार ! मनाचे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात!"
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत, मृण्मयी देशपांडेने शेअर केली होती पोस्ट
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने शेअर केलेल्या पोस्ट लिहिले होते की, "माननीय उच्च न्यायालयाने 'मना' चे श्लोक या चित्रपटाच्या प्रदर्शन थांबवण्यासाठीच्या केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान, चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी स्थगिती आदेश देण्यास नकार दिला. त्यामुळे चित्रपट प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. आम्ही 'मना'चे श्लोक' चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो. गेल्या पाच महिन्यांपासून आम्ही या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मेहनत करत आहोत. 'मना'चे श्लोक या नावाचा चित्रपट येत असल्याचे सर्वांनाच खूप आधीपासून माहीत होते. मात्र प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी सिनेमाचे प्रदर्शन थांबवण्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रदर्शनाच्या दोन दिवस आधीपासून सोशल मीडियावर नावाबाबत विरोधाचे मेसेजेस फिरू लागले. या सगळ्या गोष्टींमुळे संपूर्ण टीमला अनावश्यक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. घटनांचा क्रम बघता हे सर्व पूर्वनियोजित असल्याची शंका येते आणि हे दुर्दैवी आहे. चित्रपटामध्ये रामदास स्वामींचा किंवा त्यांच्या कुठल्याही श्लोकाचा उल्लेख सुद्धा नाही. 'मना'चे श्लोक हे शीर्षक चित्रपटातील नायक व नायिका म्हणजेच-मनवा आणि श्लोक यांनी त्यांच्या मनांबरोबर सुरू केलेल्या प्रवासाशी संबंधित आहे. आम्ही सर्वजण रामदास स्वामींच्या सर्व रचनांचा सन्मान करतो आणि त्यांचा अवमान करण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही. आम्ही या नावाशी प्रामाणिक आहोत. आता संपूर्ण मराठी सिनेसृष्टी स्वतःच्या पायांवर भक्कमपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत असताना, अशा कौटुंबिक सिनेमाचं स्वागत करण्याऐवजी कुठलीही माहिती न घेता, सर्वांना विरोध करण्यास प्रवृत्त करण्यात आले हे निराशा जनक आहे. अखेर माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. आम्ही प्रेक्षकांना विनंती करतो की, जसे तुम्ही याआधी आम्हाला प्रेम दिले, तसेच यावेळीही चित्रपटाला भरभरून प्रेम द्यावे. आणि मनामध्ये कुठलेही किंतु परंतु न आणता या सिनेमाला आशीर्वाद आणि भरघोस प्रतिसाद द्यावा.
तुमचीच, टीम"
सिनेमा कोणत्या विषयावर आधारित आहे?
मृण्मयी देशपांडे लिखित आणि दिग्दर्शित सिनेमामध्ये आजच्या तरुण पिढीची नाती, त्यांचे विचार हा विषय पाहायला मिळणार आहे. मनवा आणि श्लोक ही दोन वेगवेगळ्या पात्रांभोवती फिरणारा हा सिनेमा आहे. मनवा ही धाडसी आणि बिनधास्त मुलगी आहे, तर श्लोक हा शांत-समंजस मुलगा आहे. हे दोन भिन्न स्वभावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या प्रेमकथेत काय घडतं? याची गोष्ट सिनेमामध्ये पाहायला मिळणार आहे.
(नक्की वाचा: Gondhal Movie Teaser: 'कांतारा', 'दशावतार'नंतर आणखी एक दमदार सिनेमा येतोय, पद्मविभूषण इलैयाराजांनी दिलंय संगीत)
सिनेमामध्ये कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार?
सिनेमामध्ये मृण्मयी देशपांडे, राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब असे कलाकार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world