जाहिरात

Gondhal Movie Teaser: 'कांतारा', 'दशावतार'नंतर आणखी एक दमदार सिनेमा येतोय, पद्मविभूषण इलैयाराजांनी दिलंय संगीत

Gondhal Movie Teaser: मराठी सिनेमाला सुप्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा यांनी संगीत दिलंय. सिनेमाचे टीझर पाहून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालीय.

Gondhal Movie Teaser: 'कांतारा', 'दशावतार'नंतर आणखी एक दमदार सिनेमा येतोय, पद्मविभूषण इलैयाराजांनी दिलंय संगीत
Gondhal Movie Teaser: आणखी एक दमदार सिनेमा लवकरच होणार रिलीज
Gondhal Movie

Gondhal Movie Teaser: 'कांतारा' सिनेमासह थीएटर्समध्ये रिलीज झालेला 'गोंधळ' या मराठी सिनेमाचा टीझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. काही सेकंदांच्या या टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलीय. सिनेमाची भव्यता, दमदार सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टता लक्ष वेधून घेत आहे. 'कांतारा' आणि 'दशावतार' यासारख्या स्थानिक संस्कृतीवर आधारित चित्रपटांप्रमाणेच 'गोंधळ' हा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला चित्रपट आहे. कर्नाटकाच्या 20 टक्के प्रदेशात 'कांतारा'मधील परंपरा पाळली जाते, तर कोकणात ‘दशावतार'ला मोठे स्थान आहे. मात्र महाराष्ट्रातील तब्बल 80 टक्के भागात 'गोंधळ' घालण्याची पारंपरिक प्रथा आजही पाळली जाते. 

'कांतारा' आणि 'दशावतार'च्या यशाने हे सिद्ध झाले आहे की, प्रेक्षकांना आपल्या संस्कृतीशी जोडलेली, मातीचा सुगंध असलेली सिनेमॅटिक मांडणी नेहमीच भावते. 'गोंधळ' हाच वारसा पुढे नेत आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि स्थानिक संस्कृतीचा सुंदर संगम सादर करणार आहे.

आपल्या भव्य मांडणीने आणि गूढ वातावरणाने टीझर प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिक सिनेमॅटिक सादरीकरण यांचा सुंदर संगम यात दिसत आहे. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या गोंधळाच्या माध्यमातून उलगडणारी ही कथा काहीतरी वेगळंच रहस्य घेऊन येते, असं टीझरमधून दिसतंय. 

चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, "गोंधळ" हा चित्रपट महाराष्ट्राच्या परंपरेचे आणि श्रद्धेचे दर्शन आहे. "कांतारा"ने जसे आपल्या लोककलेला नवा आयाम दिला, तसाच "गोंधळ" महाराष्ट्रातील श्रद्धा, गूढता आणि परंपरा यांचं प्रतिबिंब दाखवणार आहे. आमचं उद्दिष्ट हेच होतं की ही माती हा रंग आणि ही ऊर्जा पडद्यावर जिवंत करायची."

Sankarshan Karhade Video:  लोक विनाकारण त्रास देतायेत? आई आणि त्रागा करणाऱ्या मुलावरील संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकाच

(नक्की वाचा: Sankarshan Karhade Video: लोक विनाकारण त्रास देतायेत? आई आणि त्रागा करणाऱ्या मुलावरील संकर्षण कऱ्हाडेची कविता ऐकाच)

डावखर फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद संतोष डावखर यांनी लिहिले असून सिनेमाला दिग्गज संगीतकार पद्मविभूषण इलैयाराजा यांचे संगीत लाभलंय. 

गोंधळ सिनेमातील स्टार कास्ट

सहनिर्मात्या दीक्षा डावखर असून चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या 14 नोव्हेंबर रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Pregnant Woman Dance Video: 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने Stree 2 सिनेमातील गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले Wow

(नक्की वाचा: Pregnant Woman Dance Video: 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट महिलेने Stree 2 सिनेमातील गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले Wow)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com