
No Entry Pudhe Dhoka Aahe 2: 'No Entry पुढे धोका आहे' या मराठी सिनेमाचा सीक्वेल लवकरच सिनेरसिकांच्या भेटीला येणार आहे. 13 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला होता. सिनेमातील कलाकारांची धमाल आणि 'जपून जपून जा रे' या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते. सिनेमाचा सीक्वेल यावा, अशी प्रेक्षकांची मागणी होती. मायबाप सिनेरसिकांची मागणी अंकुश चौधरीने पूर्ण देखील केली. अंकुश चौधरीने स्वतःच्या वाढदिवशी 'No Entry पुढे धोका आहे 2 - कॉमेडी ऑफ टेररर्स' सिनेमाची घोषणा केली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत सिनेमांच्या सीक्वेलचा ट्रेंड पाहायला मिळतो, मराठी कलाविश्वातही हा ट्रेंड रुजू होऊ लागलाय. प्रेक्षकांनाही असे सिनेमे पाहायला आवडतात. म्हणूनच 'No Entry पुढे धोका आहे 2 - कॅामेडी ॲाफ टेररर्स ' डबल धमाल घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
(नक्की वाचा: अंकुश चौधरीकडून चाहत्यांना बर्थडे गिफ्ट, प्रथमच झळकणार आगळ्यावेगळ्या भूमिकेत)
अंकुश चौधरीने या सिनेमाचे दिग्दर्शन केलेय. सिनेमाच्या रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये अंकुश चौधरीचा स्टायलिश लुक दिसत आहे, त्याच्या शेजारी दोन मुलीही दिसत आहेत. ज्या अर्ध्या मानवी आणि अर्ध्या रोबोच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे सिनेमामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची जादू नक्कीच पाहायला मिळणार. कॉमेडी जॉनर असलेल्या या सिनेमाला नकाश अजीज आणि सरगम जस्सू यांनी संगीत दिले आहे. सिनेमामध्ये कोणकोणते कलाकार दिसणार आहेत, याची माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आलीय.
(नक्की वाचा: Sai Tamhankar Video: आर. माधवननेही दिली दाद, सईने असा काय केलाय पराक्रम?)
आगामी सिनेमा 'No Entry पुढे धोका आहे 2'बाबत अभिनेता-दिग्दर्शक अंकुश चौधरीने म्हटलंय की,"आज वाढदिवसाच्या निमित्ताने चाहत्यांनी माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला, तो खूपच भारावणारा आहे. तुमच्या प्रेमाखातरच मी रीटर्न गिफ्ट म्हणून या सिनेमाचा दुसरा भाग घेऊन येतोय. 'No Entry'च्या पहिल्या भागावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. चाहत्यांचा आदर राखत आम्ही आज दुसऱ्या भागाची घोषणा करत आहोत.''
तर चित्रपटाचे निर्माते निखिल सैनी म्हणाले की, "आज अंकुश चौधरीचा वाढदिवस आहे. या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असूच शकत नाही. सिनेमाची टीम इतकी कमाल आहे, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा भाग होताना आम्हाला निश्चितच आनंद होत आहे. प्रेक्षकांसह आम्ही देखील या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहोत.''
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world