Exclusive फुलवंतीमधील शास्त्रीबुवांची जबाबदारी मोठी होती: गश्मीर महाजनी

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : अभिनेता गश्मीर महाजनीला एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये फुलवंती सिनेमाकरिता सर्वोत्कृष्ट अभिनेता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

जाहिरात
Read Time: 3 mins

NDTV Marathi Entertainment Awards 2025 : एनडीटीव्ही मराठी एंटरटेन्मेंट अवॉर्ड्स सोहळ्यामध्ये मराठी कलाविश्वातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला. या भव्यदिव्य सोहळ्यामध्ये मराठीसह हिंदी कलाविश्वातील कलाकारांनीही हजेरी लावली होती. फुलवंती सिनेमातील शास्त्रीबुवा या पात्राबाबत अभिनेता गश्मीर महाजनीने NDTV Marathiसोबत केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचितमध्ये खास गोष्टी शेअर केल्या आहेत, जाणून घेऊया सविस्तर...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कमी शब्दांत खूप गोष्टी मांडायच्या होत्या : गश्मीर महाजनी 

फुलवंती सिनेमातील अभिनय हा पूर्णपणे वेगळ्या धाटणीचा होता. ऐतिहासिक भूमिका करताना अभिनेते एका ठराविक पद्धतीन अभिनय करतात, ती पद्धत या सिनेमामध्ये वापरलेली नाहीय. तुम्ही जेव्हा फुलवंती सिनेमातील शास्त्रीबुवा पाहता तो सामान्य माणूस वाटतो, त्याची भाषा फक्त त्या काळातील आहे. ते पात्र कोणत्याही ठराविक पद्धतीने,स्टाइलने बोलत नाही, चालत नाही, उभे राहत नाही, तर ते दरबारातील सामान्य महापंडित वाटतात. त्यामुळे हे पात्र ज्युरींच्या कितपत पचनी पडेल, याची मला खात्रई नव्हती आणि त्यास दाद मिळाली याचे मला आश्चर्य वाटते. 

(नक्की वाचा: Exclusive : छत्रपती शिवाजी महाराजांवर हॉलिवूडच्या तोडीची सीरिज येणार? शरद केळकरचे मोठे विधान)

जबाबदारी मोठी होती : गश्मीर महाजनी 

"फुलवंती सिनेमा माझ्याकरिता वेगळा प्रयोग होता.कारण पात्राला खूप कमी शब्दांत खूप जास्त गोष्टी मांडायच्या होत्या, त्यामुळे ती जबाबदारी मोठी होती. मी नेहमी म्हणतो एका माणसाच्या एका नजरेत हजार शब्दांचे सामर्थ्य असते. ते थोड्या फार प्रमाणात व्यकंटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या माध्यमातून या सिनेमामध्ये सिद्ध करून दाखवायचं होते की समोरची व्यक्ती कितीही बोलली तसेच अन्य पात्र खूप बोलत असले तरीही तो माणूस येतो, एक नजर फिरवतो आणि त्याच्या मनात काय सुरू आहे हे तुम्हाला कळतं. तर हा अभिनय थोडासा कठीण होता", असा अनुभव गश्मीरने सांगितला.

बोलीभाषा देखील जपल्या पाहिजे : गश्मीर महाजनी 

इतक्या साऱ्या बोलीभाषा आहेत, मराठी भाषेमध्ये विविधता आहे. जितक्या जास्त बोलीभाषा तितकी आपली संस्कृती श्रीमंत होते, असे मला वाटतं. दुसऱ्या कोणत्याच भाषेमध्ये इतक्या बोलीभाषा मोठ्या प्रमाणात बोलीभाषा नाहीत. आपला वारसा आपण जपला पाहिजे. प्रमाण मराठी आहेच, जे आपण शहराकडे बोलतो गावातील एखादी व्यक्तीही प्रमाण मराठी शिकू शकते. पण जी बोलीभाषेची गोडी आहे, ती ज्या संस्कृतीमधून येते, ज्या परिसरातून येते, ते त्या-त्या ठिकाणचे वैशिष्ट्य असते, ते पुसून टाकता कामा नये, तेही जपले पाहिजे. शुद्ध अशुद्ध भाषेऐवेजी आपण प्रमाण मराठी आणि वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत, असे म्हटलं पाहिजे;असे मत गश्मीर महाजनीने मांडले. 

(नक्की वाचा : प्रेक्षक मला मारायला निघालेत, असे का म्हणाला सारंग साठ्ये?)

मराठी भाषेचा आवर्जून वापर केला पाहिजे : गश्मीर महाजनी 

मराठी माणसाने मराठी भाषेचा आवर्जून वापर केला पाहिजे. प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. माझा मुलगा शाळेमध्ये वेगवेगळ्या भाषा शिकतो पण आम्ही घरात त्याला हिंदी-इंग्रजी भाषा शिकवत नाही, बोलत नाही. आम्ही त्याच्याशी केवळ मराठी भाषेतूनच बोलतो. मी जिथे कुठे जातो तिथे पूर्णपणे मराठी भाषेतूनच संवाद साधतो. जर लोकांना भाषा कळत नसेल किंवा हिंदी - इंग्रजी भाषिक प्लॅटफॉर्म असेल तरच त्या भाषेचा वापर करतो. 

Advertisement

दरम्यान या वर्षात गश्मीर महाजनी सिनेनिर्मितीमध्ये पदार्पण करणार आहे. स्वतःचा मराठी सिनेमा तो प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे आणि त्यामध्ये अभिनयही करणार असल्याचंही त्यानं सांगितलंय.  

VIDEO: प्रमाण भाषा आणि बोली भाषा वादावर गश्मीर स्पष्टपणे बोलला