जाहिरात

Dhurandhar FA9LA Song Trend: गौरव मोरेची 'धुरंदर' एन्ट्री; FA9LA गाण्यावरील व्हिडीओ चर्चेत

Dhurandhar FA9LA Song Trend: गौरव मोरे ट्रेंड फॉलो करत हा रील बनवला. गौरवने अक्षय खन्नासारखीच हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स करत गौरव एन्ट्री घेतली.

Dhurandhar FA9LA Song Trend: गौरव मोरेची 'धुरंदर' एन्ट्री; FA9LA गाण्यावरील व्हिडीओ चर्चेत

Dhurandhar FA9LA Song Trend: रणवीर सिंहच्या धुरंदर सिनेमाचा सध्या जोरदार चर्चा आहे. धुरंधरच्या FA9LA गाण्याची आणि अक्षय खन्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर तर FA9LA गाण्यावरील रील धुमाकळ घालत आहे. मराठी अभिनेता आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरेला देखील या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आवरला नाही.

गौरव मोरे ट्रेंड फॉलो करत हा रील बनवला. गौरवने अक्षय खन्नासारखीच हेअरस्टाइल आणि त्याच्यासारखाच डान्स करत गौरव एन्ट्री घेतली. गौरवने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. धुरंधरच्या गाण्याप्रमाणे गौरवचा रील देखील लोकांच्या पसंतीस उतरत आहे.

(नक्की वाचा-  Dhurandhar FA9LA song: "अक्षय शुटिंगदरम्यान छोटा सिलेंडर घेऊनच फिरत होता"; कोरिओग्राफरने सांगितला किस्सा)

गौरवच्या रीलवर कमेंट्सचा पाऊस

काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडीओ आतापर्यंत 2 लाख 30 हजार लोकांनी पाहिला आहे. तर 17 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाईक केला आहे. गौरवच्या व्हिडीओवर अनेक कमेंटही येत आहेत. एका युजरने लिहिलं की, "अरे राडा!" आणखी एका युजरने लिहिलं की, "धुरंदर भावा....आपल्या समोर रणवीर पण फिका आहे."

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com