जाहिरात

Marathi Actress Priya Marathe death : अस्सल मराठमोळी सौंदर्यवती हरपली! प्रिया मराठेचे 10 न पाहिलेले फोटो

Priya Marathe Viral Photos : मालिकांमधून प्रिया घराघरात पोहोचली, मात्र ती केवळ मालिकांपूरती सीमित राहिली नाही. तर तिने नाटक, जाहिरात, चित्रपट या क्षेत्रातही चांगलं काम केलं.

Marathi Actress Priya Marathe death : अस्सल मराठमोळी सौंदर्यवती हरपली! प्रिया मराठेचे 10 न पाहिलेले फोटो
प्रिया मराठेचे सुंदर फोटो पाहून तिच्या आठवणी ताज्या होतील

Priya Marathe Passes Away : मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं वयाच्या 38 व्या वर्षी निधन झालं. ती गेल्या अनेक वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होती. या आजाराशी झुंज देत असताना आज तिची प्राणज्योत मालवली. वर्षभरापासून ती कर्करोगावर उपचार घेत होती. (Priya Marathe photos) आज मीरारोड येथील राहत्या घरात तिने अखेरचा श्वास घेतला. 

प्रिया अनेक मराठी मालिका, हिंदी मालिका, जाहिराती, चित्रपट, नाटकांमधून झळकली आहे. ती सोशल मीडियावरही सक्रिय होती. आपल्या आयुष्यातील चांगले क्षण ती चाहत्यांसोबतही शेअर करीत होती. मात्र तिच्या आयुष्यातील इतक्या मोठ्या संकटाबद्दल फारशी कुणाला माहिती नव्हती. 

Latest and Breaking News on NDTV

प्रिया मराठे २०१२ मध्ये अभिनेता शंतनू मोघे याच्यासोबत विवाहबंधनात अडकली होती

Latest and Breaking News on NDTV

प्रिया मराठे हिच्या आजारपणात शंतनू मोघे याने तिला शेवटपर्यंत साथ दिली. 

Latest and Breaking News on NDTV

मराठी सिनेविश्वातील एक सुंदर चेहरा. मेहनतीच्या जोरावर कमी कालावधीत तिने मोठं यश मिळवलं होतं. 

Latest and Breaking News on NDTV

प्रिया मराठे हिने 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत 'गोदावरी' तर 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत 'रायबाघन' या भूमिका साकारल्या होत्या. 

Latest and Breaking News on NDTV

प्रियाने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या, सावधान इंडियामध्येही तिला पाहायला मिळालं होतं. 

Latest and Breaking News on NDTV

प्रिया मराठे हिने मराठी मालिका आणि नाटकाची चर्चेतील नाव होतं.

Latest and Breaking News on NDTV

मराठी सिनेक्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचा कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झालं आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर अनेकांना अगदी तिच्या निकटवर्तीयांनाही यावर विश्वास ठेवणं कठीण जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

अनेक नाटकांमधूनही प्रिया मराठे झळकली होती.

Latest and Breaking News on NDTV

स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेतील तिची भूमिका कायम लक्षात राहील.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com