जाहिरात

Crime News: आधी डान्सर म्हणून भेटल्या, नंतर रचले भयंकर जाळं; प्रसिद्ध मराठी गायकाला धमकावत मागितले लाखो रुपये

Anand Shinde Extortion News: प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंना लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काय आहे या संपूर्ण प्रकरणामागील धक्कादायक रहस्य? वाचा सविस्तर.

Crime News: आधी डान्सर म्हणून भेटल्या, नंतर रचले भयंकर जाळं; प्रसिद्ध मराठी गायकाला धमकावत मागितले लाखो रुपये
"Anand Shinde Extortion Case: आनंद शिंदे यांच्याकडून लाखो रुपये उकळण्याचा कट"
प्रतिकात्मक फोटो Canva

Anand Shinde Extortion News: प्रसिद्ध मराठी गायक आनंद शिंदे यांच्याकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महिला, तिचा भाऊ आणि आईनं लैंगिक शोषणाच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देऊन आपल्याकडून जबरदस्तीने खंडणी वसून केल्याची तक्रार आनंद शिंदे यांनी नोंदवली आहे. 

गायक आनंद शिंदेंकडून खंडणी वसुली| Extortion Case Filed by Singer Anand Shinde; Investigation Handed Over to Crime Branch

हे प्रकरण तपासासाठी ठाणे गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रांच) सोपवण्यात आले आहे. पोलीस अधिकाऱ्याने तक्रारीच्या आधारे माहिती देत सांगितले की, "ही कथित खंडणी उकळणे आणि छळवणुकीचा प्रकार डिसेंबर 2023 पासून केला जात होता, अशी माहिती 64 वर्षीय गायकाने (आनंद शिंदे) दिलीय"

पहिली भेट आणि कार्यक्रमात डान्सर म्हणून काम करण्याची मागणी| First Meeting and Request for Work as a Dancer in Musical Shows

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात शिंदे यांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, संबंधित महिलेची आईसह त्यांच्या घरी पहिल्यांदा भेट झाली होती. यावेळेस दोघींनी त्यांच्या संगीत कार्यक्रमांमध्ये डान्सर म्हणून काम करण्याची संधी मागितली होती. यानंतर विविध गाण्यांच्या आणि नृत्याच्या कार्यक्रमांदरम्यान त्या महिलेची आनंद शिंदेसोबत भेट झाली.

(नक्की वाचा : वडील डॉक्टर, आई नर्स, मुलाला व्हायचं होतं कवी! पण नशीब पालटलं अन् Oxford रीटर्न मुलाने अभिनयाने बॉलिवूड गाजवलं)

लैंगिक शोषणाचा खोटा आरोप आणि 50 लाख रुपयांसह फ्लॅटची मागणी | False Allegations of Sexual Exploitation and Demand for a Flat and ₹50 Lakhs

अधिकाऱ्याने तक्रारीचा हवाला देत सांगितले की, संबंधित महिला, तिची आई आणि भावाने नंतर पुण्यामध्ये एक तक्रार दाखल केली, ज्यामध्ये त्यांनी गायकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यांनी पुढे सांगितले की, यानंतर त्या तिघांनी शिंदेंशी संपर्क साधला आणि ती तक्रार मागे घेण्याच्या बदल्यात पुण्यात एक फ्लॅट आणि 50 लाख रुपयांच्या रोख रकमेची (कॅश) मागणी केली. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात झालेल्या नंतरच्या तडजोडीच्या बैठकांदरम्यान आरोपींनी ही रक्कम कमी करून 25 लाख रुपये केली.

(नक्की वाचा : 71 वर्षांचा अभिनेता, 68 वर्षीय धाकट्या भावाचे उचलतोय सर्व खर्च, म्हणाले-माझ्या पत्नीनंही कधी काही विचारलं नाही)

1 लाखांची वसुली आणि उर्वरित 24 लाखांसाठी धमकी| Extortion of ₹1 Lakh and Aggressive Demand for Remaining ₹24 Lakhs 

एफआयआरचा (प्राथमिक माहिती अहवाल) हवाला देत त्यांनी सांगितले की, "आरोपींनी 20 मे 2026 रोजी सुरुवातीला 1 लाख रुपये घेतले आणि 22 मे रोजी उर्वरित 24 लाख रुपयांची मागणी अत्यंत आक्रमकपणे केली."

मानपाडा पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "आरोपींविरुद्ध शनिवारी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे (अँटी एक्सटॉर्शन सेल) सोपवण्यात आला आहे."

(Content Source PTI)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com