जाहिरात

Bal Karve Death News: प्रीतीचं झुळझुळ पाणी फेम बाळ कर्वे यांचे निधन, गुंड्याभाऊ पात्रामुळे मिळाली लोकप्रियता

Bal Karve Death News: गुंड्याभाऊ फेम ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. गुरुवारी (28 ऑगस्ट 2025) त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय.

Bal Karve Death News: प्रीतीचं झुळझुळ पाणी फेम बाळ कर्वे यांचे निधन, गुंड्याभाऊ पात्रामुळे मिळाली लोकप्रियता
Bal Karve Death News: ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन

Bal Karve Death News: मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे (Veteran Actor Bal Karve) यांचे निधन झाले आहे. बाळ कर्वे यांनी गुरुवारी (28 ऑगस्ट 2025) या जगाचा निरोप घेतलाय. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. 

बाळ कर्वे यांना गुंड्याभाऊ पात्रामुळे मिळाली लोकप्रियता (Bal Karve| Gundyabhau)

1979 साली दूरदर्शन वाहिनीवर झळकलेल्या "चिमणराव" (Chimanrao TV Serial) या मालिकेमध्ये कर्वे यांनी गुंड्याभाऊ हे पात्र साकारलं होते. गुंड्याभाऊ या भूमिकेमुळे बाळ कर्वे यांना प्रचंड लोकप्रियता आणि ओळख मिळाली. मराठी सिनसृष्टीमध्येही ते "गुंड्याभाऊ" म्हणून प्रसिद्ध झाले. बाळ कर्वे यांनी प्रपंच, अभिलाषा, स्वामी यासारख्या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 

बाळ कर्वे यांनी कोणकोणत्या सिनेमांमध्ये केलंय काम?

  • बन्याबापू (1978 Banyabapu)
  • लपंडाव (1993 Lapandav)
  • गोडी गुलाबी (1991 Godi Gulabi)
  • चटक चांदणी (1982 Chatak Chandni)

(नक्की वाचा: Ravi Jadhav News: रोल कापला पण फोटो वाचला आणि प्रेक्षकही... 'नटरंग' फेम दिग्दर्शक रवी जाधव असं का म्हणाला?)

चिमणराव मालिकेतील बाळ कर्वे यांचे खास फोटो

स्मित सुशील प्रभुखानोलकर नावाच्या युजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर बाळ कर्वे यांचे खास फोटो शेअर केले आहेत.

(नक्की वाचा: Jyoti Chandekar : 'ठरलं तर मग' मधील पूर्णा आजीचं निधन, अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी घेतला अखेरचा श्वास)

 प्रीतीचं झुळझुळ पाणी या लोकप्रिय गाण्यामधील बाळ कर्वे यांची झलक (Pritich ZulZul Paani Song)

दिग्गजांकडून ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांना श्रद्धांजली 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com