मिथून चक्रवर्तीनं ऐकेकाळी स्टाईल, अभिनय आणि नृत्य या जोरावर कोट्यवधी फॅन्सच्या ऱ्हदयामध्ये घर केलं होतं. 1976 साली मृगया या सिनेमातून त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. पहिल्याच सिनेमात राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या मिथूननं बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. पण मिथूनचे अनेक चित्रपट हे कधी प्रेक्षकांपर्यंत पोहचलेच नाहीत. त्यांची घोषणा तर झाली पण त्यांनी बॉक्स ऑफिसचं तोंडही पाहिलं नाही.
कधीही प्रदर्शित न झालेले सिनेमे
1985 साली तयार झालेल्या मोहब्बत और मुकद्दरमध्ये या चित्रपटात अनेक कलाकार होते, पण हा चित्रपट कधी प्रदर्शितच झाला नाही. पुनर्मिलन (अभिनेत्री सारिका, 1977), आनंदमय (अभिनेत्री सारिका, 1977), अनाम (सहकलाकार गोविंदा, 1987), वक्त का फैसला (1997), परमेश्वर (1998), रँबो (1985), रुत आए रुत जाए (1980), लुच्चा लफंगा (1983), अनाम (1992), शोबिज (अभिनेत्री अमृता सिंह, 1991), गंगा पहलवान (1989), सडकछाप (1995), काला साम्राज्य (अभिनेत्री रिना रॉय, 1992), जालिम जमाना (1995), अमीरो का दुश्मन (1988), क्रांतिकारी (अभिनेत्री जयाप्रदा, 1992), रिश्ता (अभिनेत्री माधुरी दीक्षित, 1988), दुश्मन सुहाग का (अभिनेत्री रेखा, 1989), तालीम (1983), कसम से (1981), इश्क मोहब्बत प्यार (1981), जन्म और कर्म (1979), मर्डर इन ट्रेन (1978), मुन्ना मुन्नी और मां (1979), भगिनी (1979), दानवीर (1992) आणि सौ दिन सास के (1980) यासह तब्बल 29 चित्रपटांची घोषणा झाली. त्याचं काही शूटिंगही झालं पण ते कधीही प्रदर्शित झाले नाहीत.
डान्सिंग स्टारचा दर्जा
मिथून चक्रवर्तीला तीन वेळा अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तो या इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक काम करणाऱ्या कलाकारांमध्ये त्याचा समावेश आहे. मिथून दा नं हिंदीसह उडीया, बांग्ला, भोजपूरी भाषेतील चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 1980 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या 'डिस्को डान्सर' नं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड केले. त्यामुळे डान्सिंग स्टार अशीही मिथूनची ओळख निर्माण झाली. छोट्या पडद्यावरही मिथून सक्रीय असून डान्स रिएलिटी शो मध्ये जज म्हणून काम केलं, तो रोल देखील चांगलाच गाजला होता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world