जाहिरात
Story ProgressBack

मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार

आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवून बॉलिवूडमध्ये स्वतःचा ठसा उमटवणारे मिथुन चक्रवर्ती केवळ करिअरमुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतात.

Read Time: 3 mins
मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार
मिथुन चक्रवर्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Mithun Chakraborty : हिंदी सिनेसृष्टीतील डान्सिंग सेन्सेशन मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. मिथुन यांनी त्यांच्या कारर्कीदीमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आणि सिनेरसिकांनीही त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. मिथुन यांनी पहिल्याच सिनेमामध्ये दमदार अभिनय करून राष्ट्रीय पुरस्कार मिळवला होता. यानंतर मिथुन केवळ करिअरमुळेच नव्हे तर वैयक्तिक जीवनामुळेही सातत्याने चर्चेत असत. बॉलिवूडमध्ये त्यांच्याशी संबंधित अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. मिथुनदांच्या एका चुकीमुळे ऋषी कपूर मरता-मरता वाचले होते, असाही एक किस्सा आहे. नेमके काय घडले होते? कोणत्या कारणामुळे ऋषी कपूर यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता? या घटनेतून ते कसे बचावले? जाणून घेऊया सविस्तर माहिती....

(ट्रेडिंग न्यूज: रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस)

मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे ऋषी कपूर यांचा जीव धोक्यात

वर्ष 1978 मधील हा किस्सा आहे. 'फूल खिले हैं गुलशन गुलशन' सिनेमाचे शूटिंग सुरू होते. दिग्दर्शक सिकंदर खन्ना यांच्या सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, अशोक कुमार, मौसमी चॅटर्जी, मुकरी, हेलेन आणि रणजीत यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमातील एक सीन शूट करताना दिग्दर्शक सिकंदर खन्ना यांनी मिथुनदांना कार चालवता येते का? असे विचारले. हा प्रश्न विचारल्यानंतर मिथुनदा थोडे घाबरले आणि त्यांनी कोणताही विचार न करता हो असे उत्तर दिले. नकार दिल्यानंतर सिनेमा गमावण्याची वेळ येऊ शकते,अशी भीती त्यांना वाटली.

(ट्रेडिंग न्यूज: मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! तेजस्विनी पंडितची इन्स्टा पोस्ट चर्चेत)

मिथुनदांनी कार चालवायला केली सुरुवात अन्...

चित्रिकरण सुरू झाल्यानंतर मिथुन चक्रवर्तींना कार भरधाव चालवून ऋषी कपूर आणि मुकरीजवळ पोहोचल्यानंतर कारला ब्रेक लावायचा होता. यानंतर दोघेही गाडीमध्ये पटकन बसणार होते, असा सीन होता. या सीनबाबत ऐकल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली. आपले खोटे कसे झाकावे? हे त्यांना समजत नव्हते. अखेर त्यांनी कार वेगाने चालवण्यास सुरुवात केली पण ऋषी कपूरजवळ पोहोचताच त्यांनी अशा पद्धतीने ब्रेक मारला की ऋषी कपूर गाडीच्या बोनेटवर आदळले आणि तोंडातून रक्त येऊ लागले. सुदैवाने त्यांना फारशी दुखापत झाली नाही आणि ते थोडक्यात बचावले. कदाचित वेळीच गाडीवर नियंत्रण मिळवले नसते तर ऋषी कपूर यांना गंभीर दुखापत झाली असती किंवा त्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता.

(ट्रेडिंग न्यूज: जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं? राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी)

दिग्दर्शकाने घेतली शाळा

मिथुन चक्रवर्ती या अपघातानंतर अधिकच घाबरले होते. त्यांनी ऋषी कपूर आणि दिग्दर्शक सिकंदर खन्ना यांची माफी मागितली व म्हटले की "मला कार चालवता येत नाही". यानंतर दिग्दर्शकाच्या रागाचा पारा चढला. त्यांनी मिथुन चक्रवर्ती यांची चांगलीच कानउघाडणी केली. 
 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
रवीना टंडनवर मारहाणीचा आरोप करणं भोवले, आता अभिनेत्रीने धाडली 100 कोटींची मानहानीची नोटीस
मिथुन चक्रवर्तींच्या या चुकीमुळे जाऊ शकला असता मोठ्या अभिनेत्याचा जीव, थोडक्यात बचावला सुपरस्टार
Bollywood actor salman khan threat to killed on YouTube
Next Article
सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, Youtube व्हिडीओ आला समोर
;