गुरुवारी बॉलिवूड क्षेत्राला हादरवणारी बातमी आली. प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्या घरात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. NDTV ला मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराने सैफ अली खानकडून एक कोटींची मागणी केली होती. सैफ त्याला पकडण्यासाठी गेला तेव्हा आरोपीने चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आरोपीने सैफच्या पाठीत, हात, मान आणि पायावर असे सहावेळा वार केले होते. या हल्ल्यात करिना कपूर खान, दोन्ही मुलं तैमूर आणि जहांगीर सर्वजण सुरक्षित आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हल्ल्याच्या वेळी सैफचा सर्वात मोठा मुलगा इब्राहिम अली खान इमारतीत उपस्थित होता. तो तातडीने आपल्या जखमी वडिलांना लीलावती रुग्णालयात घेऊन गेला. डॉक्टरांनी सैफ अली खानवर शस्त्रक्रिया केली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून आज त्याला रुग्णालयात डिस्चार्ज दिला जाणार असल्याची माहिती आहे.
नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked: सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी पाहा Exclusive Video
सैफ अली खान कुठे राहतो?
सैफ अली खान आणि करिना कपूर खान आपल्या मुलांसह वांद्रे येथील सतगुरू शरण अपार्टमेंटमध्ये राहतो. या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर त्याचं घर आहे. जेहच्या जन्मापूर्वीपर्यंत सैफ आणि करिना वांद्रे येथील फॉर्च्युन हाइट्समध्ये राहत होते. ११ वर्षांपासून ते येथे राहत होते. मात्र जेहच्या जन्मानंतर संपूर्ण कुटुंब सतगुरू शरण अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले.
बुधवारी सायंकाळी रात्रीपर्यंत करिना मैत्रिणींसोबत...
सैफ अली खानवर हल्ल्यापूर्वी करिना कपूर खान आपल्या मैत्रिणींसोबत पार्टी करीत होती. करिनाने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली होती. फोटोमध्ये ती आपली मोठी बहीण करिश्मा कपूर, मैत्रिण रिया आणि सोनम कपूरसोहत डिनर पार्टीला गेल्याचं दिसतंय.
नक्की वाचा - Saif Ali Khan News : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकांची एन्ट्री
सर्वात आधी तैमूर-जेहच्या खोलीत गेला हल्लेखोर...
काही बातम्यांनुसार, रात्री उशीरा साधारण १ ते २ वाजेदरम्यान हल्लेखोर पायऱ्यांनी (फायर एग्झिट) सैफ करिनाच्या घरात आला. यानंतर हल्लेखोराने त्यांची मुलं तैमूर-जेहच्या खोलीत घुसला होता.
घरकाम करणारीसोबत झाला वाद...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर जेव्हा तैमूर-जेहच्या खोलीत पोहोचला तेव्हा घरकाम करणाऱ्या फिलिप उर्फ लीमा तेथे उपस्थित होत्या. घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितलं की, आरोपीने तिला पकडलं. यानंतर ती आरडा-ओरडा करू लागली. आवाज ऐकून सैफ तातडीने मुलांना पाहण्यासाठी खोलीत पोहोचला.
नक्की वाचा - Saif Attacked: हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण
एक कोटींची मागणी...
सैफला पाहताच अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळी चाकू काढला. सैफने त्याला विचारलं, तुला काय हवंय? यावेळी आरोपीने पैशांची मागणी केली. सैफने विचारले, किती हवेत? आरोपीने यावर एक कोटींची मागणी केली. यादरम्यान दोन घरकाम करणाऱ्या महिला तेथे पोहोचल्या. आपण पकडले जाऊ शकतो हे हल्लेखोराच्या लक्षात आल्यानंतर त्याने सैफवर सुऱ्याने हल्ला केला. रात्री साधारण २.३० दरम्यान हा सर्व प्रकार घडला.
मुख्य दारातून आरोपी आत कसा आला?
या सर्व प्रकरणात पोलिसांना अनेकांवर संशय आहे. घरातील कोणा कर्मचाऱ्याच्या मदतीने हल्लेखोराने घरात प्रवेश केला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.