जाहिरात

Saif Ali Khan News : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकांची एन्ट्री

तपासासाठी स्थानिक आणि गुन्हे शाखेची 15 पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत.

Saif Ali Khan News : सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायकांची एन्ट्री

सैफ अली खान हल्ला प्रकरणात (Actor Saif Ali Khan Attack)  तपासाला वेग आला आहे. तपासासाठी स्थानिक आणि गुन्हे शाखेची 15 पथकं घटनास्थळी दाखल झाली आहेत. सध्या सैफच्या घरातून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या हाताचे ठसे घेतले आहेत. काही दिवसांपासून सैफच्या घरात फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं. त्यासाठी येणाऱ्या कामगारांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. सैफच्या ( Saif Ali Khan Home) घरातील चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं असून पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. इमारतीत स्वयंचलित गेट आणि कडक सुरक्षा व्यवस्था असताना अज्ञात व्यक्ती 12 व्या मजल्यावर कशी पोहोचली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.  पुढील तपासासाठी (Encounter Specialist Daya Nayak) एन्काऊंटर स्पेशलिस्ट दया नायक (Daya Nayak) सैफ अली खानच्या घरी दाखल झाले आहेत. आता दया नायक या प्रकरणातील तपास करतील. काही महिन्यांपूर्वी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास दया नायक यांच्याकडे होता. 

Saif Ali Khan Attack : इमारतीच्या पाईपवरुन चढला, तैमूरच्या खोलीत शिरला अन्...; सैफ प्रकरणात मोठी अपडेट

नक्की वाचा - Saif Ali Khan Attack : इमारतीच्या पाईपवरुन चढला, तैमूरच्या खोलीत शिरला अन्...; सैफ प्रकरणात मोठी अपडेट

87 पेक्षा जास्त एन्काऊंटर, कोण आहेत दया नायक?
दया नायक 1995 मध्ये पोलीस भरतीत पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले. प्रदीप शर्मा यांच्यासोबत त्यांनी गुन्हे अन्वेषण शाखेत काम सुरू केले. दया नायक हे शर्मा यांच्या एन्काऊंटर पथकात होते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर दया नायक यांची पहिली पोस्टिंग जुहू पोलीस ठाण्यात झाली होती. 31 डिसेंबरच्या रात्री दया नायक ड्युटीवर होते. यादरम्यान त्यांना छोटा राजन गँगच्या दोन गटांची माहिती मिळाली. दया जेव्हा त्यांना अटक करण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांनी दया यांच्यावर गोळीबार केला. यावेळी प्रत्युत्तरादाखल दया यांनी दोन्ही गँगस्टरांवर गोळ्या झाडल्या. यात दोघांचा मृत्यू झाला. हा दया यांचा पहिला एन्काऊंटर होता. यानंतर दया घाबरले होते. विभाग त्यांना निलंबित करेल अशी त्यांना भीती होती. आतापर्यंत दया नायक यांनी 87 हून जास्त एन्काऊंटर केले आहेत. दया यांनी 1999 ते 2003 दरम्यान दाऊदचा भाऊ छोटा राजन याच्या गँगलाही संपवलं होतं. 

वादग्रस्त व्यक्तिमत्त्व...
दया नायक यांच्या कार्यकाळात त्यांच्या नावाभोवती अनेक वाद घोंगावत होते. 2003 मध्ये एका पत्रकाराने त्यांच्यावर दाऊद गँगकडून पैसे घेऊन शाळा सुरू केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात कोर्टाच्या निर्देशानुसार त्यांच्यावर मकोकाअंतर्गत प्रकरण दाखल केलं होतं. या प्रकरणात 2010 मध्ये उच्च न्यायालयाने त्यांची सुटका केली होती.   

Saif Ali Khan Attack News Live Updates : सैफ अली खानच्या मानेवर चाकूने वार, शरीरावर 6 जखमा

नक्की वाचा - Saif Ali Khan Attack News Live Updates : सैफ अली खानच्या मानेवर चाकूने वार, शरीरावर 6 जखमा

बेहिशेबी मालमत्ता आणि अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याच्या आरोपावरून त्यांना पोलीस सेवेतून 2006 साली निलंबित करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ACB ने त्यांना अटक केली होती. पुढे ACB ने कोणतेही पुरावे न दिल्याने नायक यांना क्लिन चीट मिळाली. 

2012 मध्ये नायक यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. त्यांची नियुक्ती मुंबईत करण्यात आली. त्यानंतर त्यांची बदली नागपूर येथे करण्यात आली. त्या ठिकाणी रूजू न झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पुढे 2016 मध्ये त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेत मुंबईत त्यांची पोस्टिंग करण्यात आली. विशेष म्हणजे नाना पाटेकर यांनी मुख्य भूमिका साकारलेला 'अब तक 56' हा चित्रपट दया नायक यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हटलं जातं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com