जाहिरात
This Article is From May 27, 2024

मुनव्वर फारूकीनं केलं दुसरं लग्न, पाहा कोण आहे नवी बेगम महजबीन कोटवाला

Munawar Faruqui Marriage : बिग बॉस 17 चा विनर मुनव्वर फारुकीनं दुसरं लग्न केलं आहे.

मुनव्वर फारूकीनं केलं दुसरं लग्न, पाहा कोण आहे नवी बेगम महजबीन कोटवाला
मुंबई:

बिग बॉस 17 चा विनर मुनव्वर फारुकीनं दुसरं लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्याची तब्येत बिघडली होती. त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यातच मुनव्वरनं दुसरं लग्न केल्याची बातमी आल्यानं फॅन्सना धक्का बसलाय. मुनव्वरच्या लग्नाची बातमी वाचून अनेक जण त्याची नवी बेगम कोण आहे याबाबत शोध घेत आहेत. मुनव्वर दुसऱ्यांदा लग्न कुणाशी केलंय ? ती मुलगी कोण आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'टाईम्स नाऊ' च्या रिपोर्टनुसार मुनव्वर फारुकीनं घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं आहे. या रिपोर्टनुसार त्यानं 10-12 दिवस पूर्वीच लग्न केलंय. काही जवळचे मित्र आणि घरची मंडळीच या लग्नाला उपस्थित होते. मुनव्वरच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील आयटीसाी मराठा हॉटेलमध्ये हे लग्न झालं. महजबीन कोटवाला असं त्याच्या बायकोचं नाव आहे, अशी माहिती सांगितली जात आहे. ते व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. 

मुनव्वरची जवळची मैत्रिण हिना खान देखील या लग्नात सहभागी झाली होती, अशी चर्चा आहे. हिनानं नुकताच मुनव्वरसोबत एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये 'मेरे यार की शादी है', हे गाणं वाजत होतं. बिग बॉस 17 दरम्यान मुनव्वर त्याच्या खासगी आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत होता. तो एकाच वेळी अनेक मुलींबरोबर डेट करत होता, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. 

( नक्की वाचा : हार्दिक पांड्याची पत्नी नताशाला घटस्फोटानंतर 70 टक्के संपत्ती मिळणार? वाचा काय आहे कायदा )

( नक्की वाचा :  'कुणीतरी रस्त्यावर...' घटस्फोटाच्या चर्चेत हार्दिकच्या पत्नीच्या पोस्टनं खळबळ )