जाहिरात

Ashish Ubale Death: सिनेविश्व हादरलं! प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने संपवलं आयुष्य, नोटमध्ये सांगितलं कारण

Ashish Ubale Death: सिनेविश्व हादरलं! प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने संपवलं आयुष्य, नोटमध्ये सांगितलं कारण

संजय तिवारी, नागपूर: प्रसिद्ध मराठी  लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये त्यांनी आपले आयुष्य संपवले. डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने आयुष्य संपवत असल्याचा मेसेज त्यांनी स्वतःला पाठवला आणि त्यानंतर हा टोकाचा निर्णय घेतला. या भयंकर घटनेने सिनेविश्वात एकच खळबळ उडाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रसिद्ध  लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आशिष उबाळे यांनी नागपूरच्या रामकृष्ण मठातील एका गेस्ट रूममध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. तशा आशयाचा मेसेज उबाळे यांनी स्वतःला व्हॉट्सॲप वर पाठविल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

नागपूरच्या रामकृष्ण मठामध्ये त्यांचा लहान भाऊ सारंग उबाळे हा सेवेकरी म्हणून काम करत होता त्याला भेटण्यासाठीच आशिष उबाळे आले होते. ते गेस्टरुममध्ये मुक्कामी होते. त्यांनी मठामध्ये जेवण केले आणि दुपारी आराम करण्यासाठी असे सांगून रुममध्ये गेले. सायंकाळी त्यांचा भाऊ सारंग त्याला उठवण्यासाठी गेला असता त्यांनी रूमचा दरवाजा उघडला नाही, त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला

 याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आशिष उबाळे यांनी स्वतःला व्हाट्सअपवर स्वतःला एक नोट पाठवली आहे ज्यामध्ये कर्जामध्ये असल्याने आयुष्य संपवल्याचे म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. 

(नक्की वाचा: Virat Kohli Anushka Sharma: विराट कोहली-अनुष्का शर्माचा मुलांसोबतचा नवा VIDEO VIRAL, वामिकाने वेधले लक्ष)

दरम्यान, आशिष उबाळे यांनी अग्नी, एका श्वासावे अंतर, किमयागार अशा मालिकांची निर्मिती केली आहे. तसेच गार्गी, प्रेमासाठी वाटेल ते, बाबुरावला पकडा या चित्रपटांचीही निर्मिती त्यांनी केली आहे. महत्वाचे म्हणजे आशिष उबाळे यांचा एक तरुणी आणि तिचा भाडोत्री नृत्य-जोडीदार यांची कहाणी असलेला ‘गार्गी' नावाचा त्यांचा चित्रपट 2009 साली नागपूर येथे भरलेल्या कार्लस्बर्ग आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता. 

हेरा फेरी 3 सिनेमासमोर नवे संकट, परेश रावलने सोडला सिनेमा? बाबू भैयाने काय सांगितलं

Listen to the latest songs, only on JioSaavn.com