
Navratri Festival 2025 New Trending Marathi Song: अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. \
करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. विकी वाघ याने हे गाण लिहीलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शन ही केले आहे. या गाण्याची निर्मिती जेएसबी प्रोडक्शन यांनी केली आहे. हे गाणं कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आले आहे.
Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ 42 व्या वर्षी आई होणार, उशिरा मातृत्वाचा ट्रेंड काय आहे?
दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “मला खूप दिवसांपासून एखाद एनर्जेटिक गाणं करायचं होत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी “अंबाबाई” गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोझिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाण रेकॉर्ड करायचं ठरवलं.
मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लशीत करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही. किन्नर, संबळ वादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी, जोगवा मागणाऱ्या जोगतीण या महाराष्ट्रातील पिढ्यान पिढ्या आपला वारसा व संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी “अंबाबाई” गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो.”
पुढे तो गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतो, “अंबाबाई गाण संपूर्ण टीमने न झोपता सलग २४ तास शूट केल कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली. या गाण्यातून प्रेक्षकांना “सगळ्यांचा आदर करा” हा संदेश मिळतो. प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता. हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलस करेल यात शंका नाही. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे “अंबाबाई” गाण्याला खूप प्रेम द्या. तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.”
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world