NDTV नेटवर्कची मराठी वृत्तवाहिनी असलेल्या NDTV मराठीकडून मराठी मनोरंजन क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत. मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि ओटीटी माध्यमातील उल्लेखनीय योगदानांची ओळख व्हावी आणि त्यांचा सन्मान व्हावा यासाठी हे एक नवीन व्यासपीठ आहे.
NDTV मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स हे मराठी चित्रपट, टेलिव्हिजन आणि OTT मधील कलावंत, चित्रपट निर्माते, कंटेंट निर्माते आणि मराठी मनोरंजन क्षेत्राला आकार देण्यास महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रॉडक्शन हाऊसमधील प्रतिभेला यामुळे जगासमोर येणार आहे.
मराठी एंटरटेनमेंट अवॉर्ड्स 2025 मध्ये ज्युरी, समीक्षक आणि विशेष श्रेणीतील विजेते असतील, ज्यामुळे प्रतिभा आणि सर्जनशीलतेचे सर्वसमावेशक आणि न्याय्य मूल्यमापन होईल. या वर्षीच्या सन्माननीय ज्युरींमध्ये भरत दाभोलकर (जाहिरात व्यावसायिक, लेखक, दिग्दर्शक), स्वप्ना वाघमारे जोशी (दिग्दर्शिका, लेखक, निर्माता), उषा काकडे (संस्थापक-अध्यक्ष, ग्रॅविटस फाऊंडेशन; निर्माता- UKP), अक्षय बर्दापूरकर, (संस्थापक, प्रमुख प्लॅनेट मराठी), अभिजीत फणसे (निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक, रावण फ्यूचर प्रॉडक्शन), आदित्य सरपोतदार (चित्रपट दिग्दर्शक, निर्माता), राहुल निंगाप्पा खिचडी (एनडीटीव्ही मराठी), आणि श्रीमती निदर्शना रमेश गोवाणी (संस्थापक, कमला अंकीभाई गोवाणी ट्रस्ट) या दिग्गज मंडळींचा समावेश आहे.
( नक्की वाचा : Chhaava : छावा चित्रपटावरील शिर्के कुटुंबीयांच्या आक्षेपाला दिग्दर्शकांचं उत्तर, महत्त्वाच्या मुद्याकडं वेधलं लक्ष )
फिल्ममेकिंग, टेलिव्हजनसह वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरीसाठी हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये
- सर्वोत्कृष्ट चित्रपट
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक
- सर्वोत्कृष्ट अभिनेता(नायक)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता(सहकलाकार)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहकलाकार)
- सर्वोत्तम म्युझिक अल्बम
- सर्वोत्कृष्ट गायिका
- सर्वोत्कृष्ट गायक
- सर्वोत्कृष्ट गीतकार
- सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार
- सर्वोत्तम कथानक
- सर्वोत्तम पटकथा
- सर्वोत्तम छायाचित्रण
- सर्वोत्तम कला दिग्दर्शन
- सर्वोत्तम संकलन
- सर्वोत्तम वेशभूषा
- सर्वोत्कृष्ट नायिका (OTT)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (OTT मालिका)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (टीव्ही मालिका)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (टीव्ही मालिका)
- सर्वोत्तम टीव्ही शो (नॉन फिक्शन)
- सर्वोत्कृष्ट निवेदक
या व्यतिरिक्त, समीक्षक पुरस्कार खालील श्रेणींमध्ये सादर केले जातील:
- सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पुरस्कार)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पुरस्कार)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पुरस्कार )
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ( समीक्षक पुरस्कार)
एनडीटीव्ही मराठीच्या कार्यकारी संपादक नियती बोहरा यांनी सांगितले की, "मराठी मनोरंजन उद्योगात लक्षणीय वाढ होत आहे. समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि आकर्षक कथाकथनासाठी ओळखले जाणारे, मराठी चित्रपट, दूरदर्शन आणि डिजिटल सामग्रीने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. या वाढीला चालना देणाऱ्या आणि मराठी मनोरंजनाचे भविष्य घडवणाऱ्या व्यक्तींना ओळखण्याचा NDTV मराठी या नात्याने, आमचा प्रयत्न आहे.
NDTV ब्रँड स्टुडिओचे महसूल प्रमुख गौरव दिवाणी यांनी या उपक्रमाचे व्यापक महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "NDTV ची प्रादेशिक उपस्थिती वाढवत असताना, मराठी मनोरंजन पुरस्कार 2025 प्रादेशिक मनोरंजन क्षेत्रात वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे.
IWMBuzz चे संस्थापक आणि मुख्य संपादक सिद्धार्थ लाइक यांनी या भागीदारीवर भाष्य करताना म्हणाले की, "मराठी मनोरंजनाला समृद्ध वारसा आहे आणि त्याचा प्रभाव भारतीय मनोरंजन उद्योगात सतत वाढत आहे. IWMBuzz मध्ये, आम्ही सर्व प्लॅटफॉर्मवर प्रतिभेचा गौरव करण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि मराठी मनोरंजन पुरस्कार 2025 साठी NDTV सोबतची ही भागीदारी प्रादेशिक कथाकथनाला उंचावण्यासाठी एक पाऊल आहे. मराठी मनोरंजनातील सर्वोत्कृष्टांना ओळखणे आणि त्यांचा सन्मान केल्याने केवळ उद्योगाला बळकटी मिळत नाही तर त्याचा सांस्कृतिक प्रभावही मजबूत होतो.