जाहिरात

Netflix Latest movie: मनोज वाजयेपीसह मराठी, निर्माता, कलाकारांची फौज; Inspector Zende चा ट्रेलर तुफान हिट

मनोज वाजपेयीसोबत या चित्रपटात अभिनेते सचिन खेडेकर, भाऊ कदम, हरीश दुधाडे, ओंकार राऊत, भरत सावले आणि नितीन भजन हे आहेत. त्यांच्यातील सहज संवाद आणि विनोदामुळे हा पाठलाग अधिक मनोरंजक वाटतो.

Netflix Latest movie: मनोज वाजयेपीसह मराठी, निर्माता, कलाकारांची फौज; Inspector Zende चा ट्रेलर तुफान हिट
Inspector Zende

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या बहुप्रतिक्षित 'इन्स्पेक्टर झेंडे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असून, त्याचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांने केले आहे. तर, जय शेवाकरमणी आणि ओम राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. थरारक आणि विनोदी अशा दोन्हींचा संगम असलेला हा चित्रपट 5 सप्टेंबरपासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे.

'इन्स्पेक्टर झेंडे'च्या ट्रेलर प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. दोन दिवसात हा ट्रेलर नेटफ्लिक्सच्या इन्टाग्राम अकाऊंटवर 26 लाख लोकांनी पाहिला आहे. तर एक लाखांहून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अशारितीने हा सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चित्रपटाची कथा

या चित्रपटात मनोज वाजपेयी एका अत्यंत चलाख आणि हुशार पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणजेच 'झेंडे'च्या भूमिकेत आहे. तो एका कुख्यात आणि रहस्यमयी गुन्हेगार 'कार्ल भोजराज' याचा पाठलाग करताना दिसतो. कार्ल भोजराज हे नाव कुख्यात सीरियल किलर चार्ल्स शोभराजच्या नावाने प्रेरित आहे. ट्रेलरमध्ये पोलीस आणि गुन्हेगार यांच्यातील पाठलाग रोमांचक पद्धतीने दाखवण्यात आला आहे.

पाहा ट्रेलर

मनोज वाजपेयीसोबत या चित्रपटात अभिनेते सचिन खेडेकर, भाऊ कदम, हरीश दुधाडे, ओंकार राऊत, भरत सावले आणि नितीन भजन हे आहेत. त्यांच्यातील सहज संवाद आणि विनोदामुळे हा पाठलाग अधिक मनोरंजक वाटतो. याशिवाय, गिरिजा ओक आणि वैभव मांगले यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. गुन्हेगाराचा पाठलाग मुंबईतील अनेक शहरांमधून सुरू होऊन शेवटी गोव्यात संपतो, जिथे झेंडे आणि त्याच्या टीमच्या हुशारीने आणि मेहनतीने 'कार्ल'ला पकडला जाता.

'इन्स्पेक्टर झेंडे' मध्ये काम करण्याबद्दल बोलताना मनोज वाजपेयीने सांगितलं की, "चित्रपटातील 'इन्स्पेक्टर झेंडे' ची भूमिका मला खूप आवडली. तो केवळ प्रसिद्धीसाठी काम करत नव्हता, तर आपले कर्तव्य बजावत होता आणि त्याच कर्तव्यादरम्यान त्याने एका मोठ्या गुन्हेगाराला दोन वेळा पकडले. त्याचं शौर्य, विनोदबुद्धी आणि मुंबईचा विशेष बाज मला खूप प्रेरणादायी वाटला. त्याला भेटणे म्हणजे एका पुस्तकातील पात्राला भेटल्यासारखे होते. ट्रेलर फक्त एक झलक आहे, खरा चित्रपट तुम्हाला त्याच्या कथेच्या आत घेऊन जाईल."

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com