Nivedita Saraf News: "अग्गंबाई सासूबाई" या मालिकेच्या माध्यमातून निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मालिकेतील दोघांच्या भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकलं होते. आता हीच जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' या नव्याकोऱ्या सिनेमामध्ये ही जोडी झळकणार आहे. 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta Movie) या आगामी सिनेमाच्या हटके पोस्टर्समुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडीचंही मोशन पोस्टर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाल होतं. त्यांच्या पोस्टर्सची चर्चा सुरू असतानाच आता सोशल मीडियावर या सिनेमाचे दुसरे पोस्टर झळकलंय. या मोशन पोस्टरनेही प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण केले आहेत. आता दुसऱ्या पोस्टरमध्ये निवेदिता सराफ (Nivedita Saraf News) आणि गिरीश ओक या लोकप्रिय कलाकारांची जोडी दिसत आहे आणि तीही एका गंमतीशीर पद्धतीने !
सिनेमाची काय असणार आहे कहाणी?
मोशन पोस्टरमध्ये सोफ्यावर बसलेल्या निवेदिता सराफ (Nivedita Saraf News) यांच्या डोक्यावर मुंडावळ्या आहेत, पण चेहऱ्यावर नवरीसारखी लाजरीबुजरी नाही तर मिश्किल शांतता आहे. त्यांच्यामागे गिरीश ओक अत्यंत आनंदी चेहऱ्याने हात दाखवून काहीतरी सांगू पाहात आहेत. हे दृश्य पाहून एक कळतेय की, हे पारंपरिक जोडपे नाही पण त्यांचं नातं मात्र पक्कं आहे!
(नक्की वाचा: निवेदिता सराफ यांची आवडती व्यक्ती पाहिली का? अशोक सराफ नाही तर...पाहा PHOTO)
जबरदस्त कलाकारांची टीम
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले की, "आजच्या पिढीला नात्यांबाबत स्पष्टता आहे, पण लग्नाविषयी गोंधळही आहे. काही वेळा प्रेम, मैत्री आणि जबाबदारी ही लग्नाच्या साच्यात न बसताही खूप सुंदर नातं उभारते. 'बिन लग्नाची गोष्ट' त्याचं एक हलकंफुलकं, तरीही अर्थपूर्ण प्रतिबिंब आहे. निवेदिता सराफ, गिरीश ओक, प्रिया बापट, उमेश कामत हे चौघेही जबरदस्त कलाकार आहेत. त्यांच्या अप्रतिम अभिनयाने ही गोष्ट अधिकच जिवंत झाली आहे."
(नक्की वाचा: अशोक सराफ-निवेदिता यांचा लग्नसोहळा कुठे आणि कसा होता? वाचा भन्नाट किस्सा)
निर्माते नितीन वैद्य म्हणतात, "आजची तरुण पिढी नात्यांकडे वेगळ्या दृष्टीने बघते. हे चित्रपटातून दाखवताना आम्ही गंमतीची किनार कायम ठेवली आहे. प्रत्येक वयोगटाला ही गोष्ट रिलेट होईल. हलक्याफुलक्या मांडणीतून ही कथा प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजेल, याची आम्हाला खात्री आहे."
या सिनेमामध्ये प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तर सुनील बियानी, पवन मेहता आणि नितीन प्रकाश वैद्य निर्माते आहेत