Palash Muchhal And Natasa Stankovic Viral Video : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकल्यानंतर सर्वांना थक्क करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मेरी डिकोस्टा नावाच्या तरुणीसोबत पलाशने चॅटिंग केल्याचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले होते. त्यानंतर स्मृती आणि पलाशच्या लग्नाबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. अशातच आता पलाश मुच्छल आणि अभिनेत्री नताशा स्टॅन्कोव्हिक यांचा एक जुना व्हिडिओ रेडिटवर पुन्हा व्हायरल झाला आहे.दोघेही कार ड्राईव्ह दरम्यान गाण्यांचा मनमुराद आनंद लुटत असल्याचं या व्हिडीओ पाहायला मिळत आहे.
कारमध्ये DJ वाले बाबू गाणं लावलं आणि नंतर..
हा व्हिडिओ,जो काही वर्षांपूर्वी पोस्ट करण्यात आला होता,त्यात नताशा तिच्या हिट गाण्यावर ‘DJ वाले बाबू'(बादशाह) एन्जॉय करताना दिसते. याच गाण्यामुळे नताशा प्रकाशझोतात आली होती.तसच नताशा व्हिडीओत गाण्याचं लिप-सिंक करत असल्याचंही दिसत आहे. “दुनिया रखूं जूतों के नीचे, तू कहे तो बन जाऊं DJ” हे गाणं सुरु असताना पलाश तिच्या शेजारी बसून हसत हसत तो क्षण एन्जॉय करताना दिसतो. पलाश-नताशाची जुनी व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नताशा व्हिडिओमध्ये रिलॅक्स मूडमध्ये गाणी गात असल्याचं व्हिडीओत दिसतंय. तर पलाशही सुरात सूर मिसळून गाण्यांचा आनंद लूटतो.
Kudiya rakhu jooto ke niche ft palash Muchhal
byu/priyansh_gif inDesiVideoMemes
स्मृती मंधानाच्या वडिलांची प्रकृती कशी आहे?
23 नोव्हेंबरला स्मृतीचे वडील श्रीनिवास यांना तब्येत बिघडल्याने तातडीनं स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी केली. या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना त्यांच्या शरीरात कोणतेही ब्लॉकेज आढळले नाही आणि सध्या त्यांची प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं जात आहे.दरम्यान, स्मृती आणि पलाशच्या लग्नाची नवी तारीख अद्यापही जाहीर केलेली नाहीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world