जाहिरात

महाभारत मालिकेतील 'ती' अजरामर भूमिका, युद्धात मृत्यू झाल्यानंतर हजारो प्रेक्षकांनी केले होते मुंडन

सुरुवातीला 'अर्जुन'ची भूमिका देऊ करण्यात आली होती. त्यांची उंच देहयष्टी आणि चेहऱ्यावरील तेज पाहून निर्माते प्रभावित झाले होते.

महाभारत मालिकेतील 'ती' अजरामर भूमिका, युद्धात मृत्यू झाल्यानंतर हजारो प्रेक्षकांनी केले होते मुंडन

Mahabharat Serial News: बी. आर. चोप्रा यांच्या गाजलेल्या 'महाभारत' या लोकप्रिय टेलिव्हिजन शोमध्ये 'सूर्यपुत्र कर्ण'  यांची अविस्मरणीय भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते पंकज धीर  यांची आज जयंती आहे. आपल्या या ऐतिहासिक भूमिकेमुळे ते आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. कर्णाची भूमिका, त्याची दानवीरता आणि युद्धकौशल्याची गाथा आजही प्रेक्षकांना भुरळ पाडते.

पण, या 'कर्ण'ला पडद्यावर साकारणाऱ्या पंकज धीर यांना सुरुवातीला त्यांच्या या पात्राबद्दल फारशी माहिती नव्हती आणि संस्कृत शब्दांचे उच्चारण करणेही त्यांना कठीण जात होते, असा एक किस्सा समोर आला आहे. पंकज धीर यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५६ रोजी पंजाबमध्ये झाला. १९८० च्य दशकात त्यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीत छोट्या भूमिकांनी सुरुवात केली. 'महाभारत'साठी जेव्हा ऑडिशन सुरू होते, तेव्हा त्यांना सुरुवातीला 'अर्जुन'ची भूमिका देऊ करण्यात आली होती. त्यांची उंच देहयष्टी आणि चेहऱ्यावरील तेज पाहून निर्माते प्रभावित झाले होते.

Katrina Kaif: 'त्या' प्रसिद्ध मंदिरात दर्शन अन् कतरिनाला पुत्रप्राप्ती.. कुठे आहे नवसाला पावणारे देवस्थान?

तीन-चार महिने ते 'अर्जुन'च्या भूमिकेसाठी तयार होते, पण दिग्दर्शकाने त्यांना मिश्या काढण्याची अट घातली. पंकज धीर यांनी मिश्या काढण्यास स्पष्टपणे नकार दिला आणि बी. आर. चोप्रांनी त्यांना स्टुडिओतून बाहेरचा रस्ता दाखवत 'पुन्हा कधी दिसू नकोस' असे सुनावले होते. काही महिन्यांनंतर, त्यांना पुन्हा फोन आला आणि यावेळी त्यांना थेट 'कर्ण'ची भूमिका ऑफर झाली. पंकज धीर यांनी लगेच होकार दिला.

पंकज धीर इंग्लिश मीडियममधून शिकलेले असल्याने, त्यांना कर्णबद्दल फारशी माहिती नव्हती आणि संस्कृतच्या एका शब्दाचाही अर्थ येत नव्हता. सेटवर संवाद बोलताना त्यांचा उच्चार अशुद्ध व्हायचा आणि त्यामुळे ते घाबरून जायचे. या कठीण काळात टीममधील एका सदस्याने त्यांना हिंदी वर्तमानपत्रे आणि पुस्तके वाचण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे त्यांची भाषा सुधारेल. मात्र, त्यांच्या भूमिकेला खरी मदत दोन महान साहित्यकृतींनी केलीय

शिवाजी सावंत  लिखित 'मृत्युंजय' : या पुस्तकातून पंकज धीर यांना दानशूर कर्णाची आंतरिक वेदना समाजाकडून होणारी उपेक्षा आणि युद्धातील दुविधा समजून घेता आली. रामधारी सिंह दिनकर लिखित 'रश्मिरथी' या रचनेमुळे त्यांचे उच्चार सुधारले आणि त्यांनी या पात्राला एक वेगळी खोली दिली. लोकप्रियतेचा शिखर आणि चांदीचे दान: या भूमिकेमुळे पंकज धीर यांना इतकी प्रसिद्धी मिळाली की, ते लोकप्रियता सर्वेक्षणात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले होते. 

VIDEO: 'खबर कलली का...', असुरवन चित्रपटाचा धमाकेदार टीझर; थरारक दृश्यांनी लक्ष वेधलं

एका मुलाखतीत त्यांनी कर्णाच्या मृत्यूच्या एपिसोडशी संबंधित एक किस्सा सांगितला. मालिकेत कर्णाचा मृत्यू झाल्यानंतर बस्तरमधील एका आदिवासी गावात हजारो लोकांनी  आपले मुंडन केले होते. मध्य प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून पंकज धीर तिथे पोहोचले, तेव्हा लोकांनी त्यांचे चांदी तुला केली. हे दृश्य पाहून पंकज धीर थक्क झाले होते. पंकज धीर यांचे याच वर्षी १५ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्करोगाने (Cancer) निधन झाले, पण त्यांचा 'कर्ण'चा प्रवास आजही प्रेरणादायी आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com