Sunny Deol Emotional Post For Dharmendra: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सनी देओल पहिल्यांदाच सोशल मीडियावर व्यक्त झालाय. धर्मेंद्र यांच्या 90व्या वाढदिवसानिमित्त त्याने इन्स्टाग्रामवर वडिलांचा खास व्हिडीओ शेअर केलाय. "आज माझ्या बाबांचा वाढदिवस आहे. ते कायम माझ्यासोबत आहेत, माझ्या आत आहेत, लव्ह यू पापा, मिस यू!" असे कॅप्शन सनीने या पोस्टला दिलंय.
व्हिडीओमध्ये धर्मेंद्र निसर्गाच्या सान्निध्यात दिसत आहे, निसर्गरम्य ठिकाण त्यांना आवडल्याचंही ते सनीला सांगत आहेत. या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांना धर्मेंद्र यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
ईशा देओलही वडिलांच्या आठवणीत झाली भावुक
ईशा देओलनंही वडील धर्मेंद्र यांच्यासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यासह तिने भावुक पोस्टही लिहिलंय. ईशा देओलनं म्हटलंय की, "माझे प्रिय बाबा, आपले सर्वात मजबूत नातं. आपण आयुष्यात, जगात आणि त्यापलीकडेही... आपण नेहमीच सोबत आहोत बाबा. स्वर्ग असो किंवा पृथ्वी, आपण एक आहोत. मी तुम्हाला अतिशय प्रेमाने माझ्या हृदयात जपून ठेवलंय, जेणेकरून मी तुम्हाला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवू शकेन. मला तुमची खूप आठवण येते बाबा". अशा आशयाची भावुक पोस्ट ईशाने वडिलांसाठी लिहिलीय. वडिलांच्या निधनानंतर ईशाने देखील पहिल्यांदाच तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ईशा देओलची भावुक पोस्ट
24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांनी जगाचा निरोप घेतला
24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. पुढील उपचार घरामध्येच करण्याचा निर्णय देओल कुटुंबीयांना घेतला होता. यादरम्यान 24 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले. विलेपार्लेतील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
(नक्की वाचा:Dharmendra: धर्मेंद्र पहिल्या सिनेमाचा करार करताना झाले होते निराश, निर्मात्यांनी खिसा रिकामा करून दिले पैसे)