Paresh Rawal drinks urine for knee injury: बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले की, त्यांनी 15 दिवस स्वत:चीच लघवी प्यायली होती. एवढेच नाही तर हे केल्याने त्यांना फायदा झाल्याचंही त्यांनी सांगितलं. 'घातक' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान परेश रावल यांच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
वीरू देवगण (अजय देवगणचे वडील) परेश रावल यांना रुग्नालयात भेटण्यासाठी गेले होते. परेश रावल यांनी सांगितले की, वीरू देवगण यांनी त्यांना गुडघ्याच्या दुखापतीतून बरे होण्यासाठी दररोज लघवी पिण्याचा सल्ला दिला होता. यानंतर त्यांनी सलग 15 दिवस लघवी प्यायली. याचा फायदा झाला आणि दुखापत लवकर बरी झाली. या उपचारामुळे अडीच महिन्यांऐवजी दीड महिन्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, असाही दावा परेश रावल यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर चमचाभर खा ही गोष्ट, 12 महिने चेहऱ्यावर राहील चमक आणि तेज)
तज्ज्ञांचं मत काय?
परेश रावल यांच्या या दाव्यानंतर इंटरनेटवर वाद सुरू झाला आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले होते. डॉ. कंवरपाल सिंग गिल यांनी यावर आपले मत मांडले आहे. डॉ. गिल यांनी एक्स हँडलवरून या विषयावर ट्विट करताना लिहिले की, 'सकाळची लघवी पिणे याला 'युरीन थेपेपी' म्हणतात. प्राचीन काळी, काही पारंपरिक वैद्यकीय प्रणालींमध्ये असे मानले जात होते की ते रोग बरे करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि शरीर स्वच्छ करते. मात्र आधुनिक वैद्यकीय शास्त्र यावर विश्वास ठेवत नाही.
(नक्की वाचा: Oiling Belly Button: झोपण्यापूर्वी नाभीवर लावा हे तेल, त्वचेसह पोटावर काय होतील परिणाम? न्युट्रिशनिस्टने सांगितले अद्भुत फायदे)
डॉ. गिल यांनी पुढे म्हटलं की, 'मूत्र हे शरीरातील टाकाऊ पदार्थांचे बनलेले असते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लघवी प्यायली तर या टाकाऊ गोष्टी शरीरात परत जातील. ज्यामुळे शरीराल नुकसान होऊ शकते. हे दुष्परिणाम गंभीर असू शकतात.
डॉ. गिल यांच्या मते, लघवी पिल्याने शरीरात बॅक्टेरिया परत येऊ शकतात आणि मूत्रपिंडांवर जास्त दबाव देखील येऊ शकतो. अशा परिस्थितीत ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही वैद्यकीय स्थितीत हे करणे टाळा. मूत्रात कोणतेही पोषक घटक किंवा जखम बरे करणारे घटक नसतात. याउलट, ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.