जाहिरात

सनी देओलची पत्नी कोण आहे ? इंग्लंडच्या राजघराण्याशी आहे संबंध, गुपचूप केलं होतं लग्न

त्यावेळी सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्याचा बेताब चित्रपट सुपरहिट झाला होता.

सनी देओलची पत्नी कोण आहे ? इंग्लंडच्या राजघराण्याशी आहे संबंध, गुपचूप केलं होतं लग्न
मुंबई:

बॉलिवूडचे ही-मॅन धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी मुंबईत निधन झाले. त्यांना मोठा मुलगा सनी देओल याने मुखाग्नी दिला होता. सनी देओल यानेही वडिलांप्रमाणे हिंदी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमावले आहे. धर्मेंद्र यांचा दुसरा मुलगा बॉबी देओल यानेही बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. 90 च्या दशकात सनी देओल हा वडिलांप्रमाणे पीळदार शरीरयष्टीचा, देखणा आणि अॅक्शनपटांसाठी पहिली पसंती असलेला अभिनेता बनला होता. धर्मेंद्र आजारी असताना सनी देओल आणि बॉबी देओल या दोघांनी त्यांची बरीच काळजी घेतली होती. बॉबी देओल याच्या पत्नी आणि कुटुंबाबद्दल अनेकांना माहिती आहे. सनी देओल हा डिंप कपाडिया हिच्यासोबतच्या प्रेमसंबंधांमुळे सातत्याने चर्चेत राहिला होता. सनी देओलचे लग्न झाले असून त्याची पत्नी अर्थात पूजा हिचे इंग्लंडच्या राजघराण्याशी संबंध आहेत. पूजाबद्दल अनेकांना माहिती नाहीये. 

नक्की वाचा: धर्मेंद्र यांचे पार्थिव स्मशानात नेण्यापूर्वी घराबाहेर दिवा का लावला, याचा अर्थ काय?

इंग्लंडमध्ये जन्मलेली' लिंडा महल' झाली 'पूजा देओल'

पूजा देओल हिचा जन्म 21 सप्टेंबर 1957 रोजी लंडन इथे झाला होता. कृष्ण देव महल यांची ती मुलगी असून कृष्ण देव महल हे कामानिमित्ताने लंडनला गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले. पूजा हिच्या आईचे नाव ज्यून सराह महल असे आहे. पूजाचे लग्नाआधीचे नाव लिंडा महल होते, लग्नानंतर ती पूजा देओल बनली. 1984 साली सनी देओल आणि पूजा यांचं लग्न झालं होतं. मात्र याबद्दल कोणालाही कल्पना देण्यात आली नव्हती. हे लग्न सनीने गुपचूप पद्धतीने उरकलं होतं. त्यावेळी सनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं आणि त्याचा बेताब चित्रपट सुपरहिट झाला होता. करिअरची सुरूवात असल्याने सनीला आपल्या लग्नाबद्दल कोणाला कळू द्यायचं नव्हतं, मात्र लंडनमधल्या एका मासिकात त्यांच्या लग्नाचा फोटो छापल्याने या लग्नाची बातमी फुटली होती. 

नक्की वाचा: ना हेमा मालिनी ना प्रकाश कौर! धर्मेंद्र यांचं पहिलं प्रेम कोण? फाळणीमुळे अपूर्ण राहीली प्रेम कहाणी

पूजानेही केले होते चित्रपटात काम

पूजाने सनी देओलसोबत चित्रपटात काम केले होते. 199 साली प्रसिद्ध झालेल्या 'हिम्मत' चित्रपटात पूजाने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पूजा ही 'यमला पगला दिवाना-2' या चित्रपटाची लेखिका आहे. सनी आणि पूजा यांना करण आणि राजवीर ही दोन मुले आहेत, या दोघांनी बॉलिवूडमध्ये येण्याची धडपड करून पाहिली मात्र त्यांना फार यश मिळालं नाही. 

 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com