जाहिरात

Poonam Pandey Video : पुनम पांडेच्या अश्लील व्हिडीओबद्दल आई काय म्हणाली? VIDEO व्हायरल 

Poonam Pandey Video : पूनम पांडेने आईसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये दलेर मेहंदीच्या गाण्यावर पूनम पांडे नाचताना दिसतं आहे.

Poonam Pandey Video : पुनम पांडेच्या अश्लील व्हिडीओबद्दल आई काय म्हणाली? VIDEO व्हायरल 

Poonam Pandey Video : प्रसिद्ध मॉडेल पूनम पांडे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सातत्याने चर्चेत असते.  बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या पूनम पांडेचा चाहता वर्गही मोठा आहे. पूनम पांडेला आता लग्नाचे वेध लागले आहेत की काय? असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. इन्स्टाग्रामवर केलेल्या एका पोस्टमुळे पूनमच्या लग्नाबाबत बोललं जाऊ लागलं आहे. 

पूनम पांडेने आईसोबतचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये दलेर मेहंदीच्या गाण्यावर पूनम पांडे नाचताना दिसतं आहे. तर व्हिडीओवर टेक्स्ट लिहिण्यात आले आहेत. ज्यात लिहिलंय की, "जेव्हा आई बोलते की सेक्सी व्हिडीओ पोस्ट करणे थांबव आणि लग्न कर." या पोस्टवर पूनम पांडेने "लग्न करु का?" असं कॅप्शन देत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे. 

पूनम पांडेच्या प्रश्नावर चाहत्यांनी देखील कमेंट करत तिला प्रतिसाद दिला आहे. अनेकांनी मी लग्न करायला तयार आहे असं म्हटलं आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिलं की, "आई तुम्ही काळजी करु नका मी आहे इथे." दुसऱ्याने म्हटलं की, "मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. तारीख ठरवायची का?"

काही निगेटिव्ह कमेंट देखील या पोस्टवर आल्या आहेत. एकाने लिहिलंय की, "तुझ्याशी लग्न कोण करणार?" आणखी एका युजरने लिहिलं की, "मला वाटलं तुझं आधीच लग्न झालं आहे."

पूनम पांडेचा आईसोबतचा हा व्हिडीओ आतापर्यंत 24 लाख लोकांना पाहिला आहे. 24 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत. तर 500 हून अधिक लोकांनी कमेंट्स केल्या आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Poonam Pandey, Poonam Pandey Bold, Poonam Pandey Bold Looks, पूनम पांडे इंस्टाग्राम, पूनम पांडे