Celebrity Diet: प्रियांका चोप्रा अमेरिकेत राहत असली तरी तिचे भारतीय जेवणावरील प्रेम अजूनही कायम आहे. प्रियांकाच्या आहारात केवळ परदेशीच नाही तर भारतीय पदार्थांचाही समावेश असतो. फिट राहण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. मात्र त्याबरोबरच आहारही चांगला असायला हवा. आहार संतुलित असेल तर अतिरिक्त फॅट्स निघून जातं. सोबतच तब्येत चांगली राहते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.
रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास आजार पडण्याचं प्रमाण कमी होतं. प्रियंकादेखील आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देते. प्रियंका चोप्रा कशी फिट राहते, ती आपल्या ताटात कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करते, याबद्दल जाणून घेऊया.
प्रियंका चोप्राचा डाएट | Priyanka Chopra's Diet
प्रियांका चोप्राने आपल्या एका मुलाखतीत या गोष्टीचा उल्लेख केला होता. ती रात्रीच्या जेवणात नेहमी सूप घेते. प्रियंका रात्रीच्या जेवणात गरमागरम सूप पिते. याशिवाय तिच्या आहारात डाळींचा समावेश असतो. भेंडी आणि बटाटा-फ्लॉवरची भाजी तिला खूप आवडते. प्रियांका आपल्या आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करते.
नक्की वाचा - Saiyaara स्टार Ahaan Panday चं आलिशान घर आतून कसं दिसतं? पाहा घराचा संपूर्ण VIDEO
पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, प्रियांका तिच्या जेवणाची सुरुवात सूपने करते. दुसरी गोष्ट म्हणजे दही. प्रियांका नेहमी दही किंवा रायता खाते. दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे गट हेल्थ चांगली राहते. यानंतर तिसऱ्या क्रमांकवर येतं सॅलेड. आपल्या आहारात ती सॅलेन आवर्जुन घेते.
लोणचं खायला आवडतं...
अनेकांना आपल्या जेवणात लोणचं हवं असतं. याशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. प्रियंकादेखील आपल्या जेवणात लोणच्याचा समावेश करते. यामुळे जेवणाची चव वाढते.
सँडविजऐवजी काय खाते?
प्रियंका चोप्रा यूएसमध्ये राहत असली तरी सँडविज खाणं टाळते. सँडविजऐवजी ताज्या भाज्या, भाजलेले मासे प्रियंकाला सर्वाधित आवडतात. ताज्या भाज्यांचं सॅलेज प्रियंकाला भरपूर आवडतं.